Join Whatsapp Group

Join Telegram Group

जिल्हा परिषद मध्ये 18,939 जागांसाठी बंपर भरती!  ZP Bharti 2023 Maharashtra

ZP Bharti 2023 – ऑनलाईन फॉर्म, जाहिरात PDF, अर्ज प्रक्रिया, आनंदाची बातमी! ZP भरती जाहिरात आली, ऑनलाईन अर्ज उद्या पासून सुरु होणार! ZP Bharti 2023

ZP Bharti 2023 – नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद भरती संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषद भरती 2023 संबंधी शासनामार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उद्यापासून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा सोबतच पात्रता निकष काय आहेत यासंबंधीची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घ्यावी.

ZP Bharti 2023

ZP Bharti 2023 information in Marathi

महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद भरती 2023 साठी अखेर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दिनांक 5 ऑगस्ट पासून जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. उद्यापासून अर्ज करण्यासाठी पोर्टल Open होणार आहे, ZP भरतीसाठी बऱ्याच कालावधीपासून विद्यार्थी मागणी करत होते अखेर त्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य करून मेगा भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

ZP Bharti 2023 Vacancy Details पदाचे नाव आणि तपशील

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)

SPMCIL भरती 2023 संपूर्ण माहिती

ZP Recruitment 2023 (तपशील)

पदसंख्या – एकूण 18,939 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पगार – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता – पदानुसार वेगवेगळी (कृपया मूळ जाहिरात पाहावी)

Form फी – इतर प्रवर्ग: रु 1000, राखीव प्रवर्ग: रु 900

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 ऑगस्ट, 2023

परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होण्याची तारीख – परीक्षेच्या आधी 7 दिवस

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट, 2023

जिल्हा परिषद भरती 2023 pdf

जिल्हा परिषद भरती 2023 साठी शासनाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये भरती संदर्भात सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज कसा करायचा? पात्रता निकष काय आहेत? वयोमर्यादा, तसेच इतर महत्त्वाच्या बाबी देखील यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. तुम्हाला जर जिल्हा परिषद भरती साठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तर त्या अगोदर शासनाने अधिकृत जाहीर केलेल्या या जिल्हा परिषद भरती 2023 pdf म्हणजेच जाहिरात Notification PDF पाहून घ्या आणि काळजीपूर्वक वाचा.

IBPS बँक भरती 2023 संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या या PDF मध्ये तुम्हाला जिल्हा परिषद भरती 2023 महाराष्ट्र संबंधी संपूर्ण माहिती मिळेल. जिल्हा परिषद भरती 2023 जाहिरात PDF डाऊनलोड करण्यासाठी खाली Direct Link दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही Notification PDF Download करून घेऊ शकता आणि वाचू शकता.

जिल्हा परिषद भरती 2023 PDF Download

How to Apply For ZP Bharti 2023 जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

जेव्हा उमेदवारांना जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यांना सर्वप्रथम वर दिलेली नोटिफिकेशन जाहिरात पीडीएफ वाचून घेणे आवश्यक आहे. सर्व माहिती जाणून घेतल्यानंतरच तुम्ही जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा.

जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ZP Recruitment 2023 साठीच्या Official Website वर जावे लागेल.

होम पेजक्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Now

वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तुम्हाला Apply Online असा एक पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, तो फॉर्म मला काळजीपूर्वक भरायचा आहे. कोणत्याही स्वरूपाची चुकीची माहिती फॉर्ममध्ये टाकायची नाही.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, त्यानंतर ZP Recruitment 2023 साठीची परीक्षा फी भरायची आहे.

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 संपूर्ण माहिती

शेवटी संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा चेक करायचा आहे, फॉर्ममध्ये कुठे चूक झाली असेल तर ती दुरुस्त करायचे आहे.

त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करून जिल्हा परिषद भरती 2023 महाराष्ट्र साठी चा फॉर्म Submit करायचा आहे.

अशा तऱ्हेने तुम्ही जिल्हा परिषद भरती 2023 साठी तुमचा फॉर्म ऑनलाईन रित्या भरू शकता. सबमिट केल्यानंतर तो फॉर्म जिल्हा परिषद विभागाकडे सादर केला जाईल. नंतर विभागाकडून ठरवण्यात आलेल्या तारखेला तुमचे हॉल तिकीट जाहीर केले जातील नंतर लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेत चे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवून त्यांची निवड केली जाईल.

ZP भरती 2023 FAQ

जिल्हा परिषद भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा या 18,939 आहेत.

जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे?

Online Form Last Date – 25 ऑगस्ट, 2023

जिल्हा परिषद भरती 2023 साठी अर्ज केव्हा सुरू होणार आहेत?

जिल्हा परिषद भरतीसाठी उद्यापासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहेत. दिनांक 05 ऑगस्ट, 2023

Leave a Comment