Join Whatsapp Group

Join Telegram Group

(नवीन) मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे, जाणून घ्या लिस्ट | Voter ID Documents in Marathi

Voter ID Documents in Marathi: मित्रांनो तुमचे जर 18 वर्ष पूर्ण झाले असेल, तर तुम्हाला मतदान यादीत तुमचे नाव नोंदणी करून घेणे आवश्यक असते.

मतदान यादीत नाव नोंदणी केल्यावरच मतदान कार्ड मिळते, त्यानंतरच तुम्हाला निवडणुकीत मत करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

तुमचे वय जरी 18 वर्षे झाले असेल, पण तुम्ही मतदान कार्ड काढले नसेल, तर तुम्हाला मतदान करता येत नाही. त्यामुळे मतदान कार्ड काढणे आवश्यक आहे.

मतदान यादीत नाव नोंदणी करण्यापूर्वी अर्जदाराला आवश्यक ते सर्व कागदपत्रे तयार ठेवावे लागतात. ते कागदपत्रे कोणते? मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट आपण या लेखामध्ये आज जाणून घेणार आहोत.

मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Voter ID Documents)

मतदान कार्ड ऑनलाईन स्वरूपात काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

  1. अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन्स)
  2. अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
  3. रहिवासी पुरावा (रेशन कार्ड, आधार कार्ड)

वर दिलेले सर्व आवश्यक ते कागदपत्रे Soft Copy मध्ये तयार ठेवायचे आहेत. ज्यावेळी Voter ID साठी ऑनलाईन अर्ज सादर केला जाईल तेव्हा हे Documents Upload करायचे आहेत.

मुख्य म्हणजे मतदान कार्ड काढण्यासाठी अर्जदार हा 18 वर्षाचा असणे अनिवार्य आहे, जर वय कमी असेल तर मतदान कार्ड काढता येणार नाही.

सोबतच जर अर्जदाराचे वय कमी असून, त्याने मतदान कार्ड काढण्यासाठी Apply केलं तर दंड भरावा लागू शकतो. 

मतदान कार्ड ऑफलाईन स्वरूपात काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

तुमचे जर 18 वर्ष वय पूर्ण झाले असेल, तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा मतदान कार्ड काढू शकता. त्यासाठी तुम्हाला वर दिलेलेच कागदपत्रे Hard Copy स्वरूपात सादर करायचे आहेत.

त्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट साइज फोटो जिल्हा परिषदेच्या शाळेत जमा करू शकता.

एकदा मतदान कार्ड साठी अर्ज सादर केला की पुढील काही महिन्यात तुमच्या घरी पोस्टाने मतदान कार्ड पाठवले जाते.

Leave a Comment