Join Whatsapp Group

Join Telegram Group

Vishwakarma Yojana 2023 – ऑनलाईन फॉर्म, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती in Marathi

Vishwakarma Yojana 2023, Apply Online, Registration, Elegibility, विश्वकर्मा योजना 2023 मराठी, Vishwakarma Yojana 2023 in Marathi, Vishwakarma Scheme, Vishwakarma Yojana in Marathi

Vishwakarma Yojana 2023: नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजना 2023 संबंधी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा, अर्ज प्रक्रिया काय आहे. अशी सर्व माहिती सविस्तरित्या आपण पाहणार आहोत.

Vishwakarma Yojana 2023

2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नव्याने जाहीर केली होती. त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने अधिवेशनात पीएम विश्वकर्मा योजनेला मान्यता दिली आहे. त्यानुसार आता देशातील नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. विश्वकर्मा योजना काय आहे? त्याचा लाभ कोणत्या व्यावसायिकांना घेता येईल? ही योजना कधी सुरु होईल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

योजनेचे नाव Vishwakarma Yojana 2023
CategoryAtmaNirbhar Bharat
कोणी सुरू केली केंद्र सरकार द्वारा
योजनेची घोषणा 15 August 2023
योजनेची सुरुवात 17 September 2023
लाभार्थी SC, ST, OBC, महिला, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती
एकूण निधीBudget 13000 to 15000 Crore Rs.

Vishwakarma Yojana Information in Marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत, विश्वकर्मा योजना 2023 संबंधी महत्त्वाची अशी घोषणा केली. कामगार आणि कारागीर वर्गासाठी अभिनव अशी योजना केंद्र सरकारने राबवण्याचा महत्त्वकांक्षी असा निर्णय घेतला आहे.

विश्वकर्मा योजना ही छोट्या व्यवसायिकांना मोठी फायद्याची ठरणार आहे. ज्या व्यक्तींना लघुउद्योग किंवा छोटे उद्योग सुरू करायचे आहेत त्यांच्यासाठी एक प्रकारे केंद्र सरकार द्वारे अर्थसहाय्य केले जाणार आहे.

Vishwakarma Yojana 2023 अंतर्गत केंद्र सरकार द्वारे व्यवसायिकांना 15,000 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. योजनेसाठी सरकारद्वारे निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. विशिष्ट शैलीतील कुशल कामगारांसाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी 50,000 हजार रुपये अर्थ सहाय

Vishwakarma Yojana 2023 म्हणजे काय?

पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्देश हा कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य प्रदान करून देशातील सर्व कुशल छोट्या व्यवसायिकांची (Business) आर्थिक क्षमता वाढवणे हे आहे. या योजनेअंतर्गत कुशल कामगारांना MSME शी जोडले जाणार आहे, जेणेकरून छोट्या व्यवसाय देखील त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी संधी मिळेल आणि त्यांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी परिपूर्ण अशी बाजारपेठ देखील मिळू शकेल.

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार? पात्रता निकष काय आहेत?

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ (Benefits) हा सुतार, सोनार, लोहार, शिल्पकार आणि कुंभार या अशा कौशल्यपूर्ण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मिळणार आहे. योजनेद्वारे कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचा तसेच त्यांना चांगल्या पातळीवरील बाजारपेठा मिळवणे तसेच देशांतर्गत बाजारपेठा आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणे हा विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकारचा प्रयत्न असणार आहे.

अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा करताना, कारागिरांना अधिक कौशल्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यासाठी या योजनेद्वारे प्रोत्साहन केले जाणार असूनच या योजनेचा फायदा हा महिला तसेच समाजातील दुर्बल घटकांना देखील होणार आहे.

Vishwakarma Yojana Benifits लाभ काय आहेत?

विश्वकर्मा योजनेद्वारे देशातील कुशल कामगारांना पाच टक्के व्याज दराने कर्ज दिले जाणार आहे. कर्जाची रक्कम ही एक लाख रुपयांपर्यंत असणार आहे. म्हणजे फक्त पाच हजार रुपये भरून कारागिरांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज भेटणार आहे. हे अर्थसहाय्य दोन टप्प्यात दिले जाणार असून पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये अशी रक्कम भेटणार आहे.

कारागिरांना त्यांची उत्पादन आणि सेवा उच्च दर्जाच्या करण्यासाठी केंद्राकडून प्रशिक्षण वर्ग देखील राबवले जाणार आहेत, प्रशिक्षण दरम्यान कारागिरांना दररोज 500 रुपये मिळणार आहेत. आणि त्यांच्या कामासाठी एखाद्या नवीन साधने खरेदी करायचे असतील तर पंधरा हजार रुपयांचे अधिक वरून मदत केली जाणार आहे.

तार कुंपण खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान, येथून लगेच अर्ज करा

PM विश्वकर्मा योजना केव्हा सुरू होणार?

पीएम विश्वकर्मा योजना 2023 ही पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. यासंबंधी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, यासाठी फिक्स तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी PM विश्वकर्मा योजना सुरू होणार आहे. या दिवशी विश्वकर्मा जयंती आहे त्यामुळे या दिवशी विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ होणार आहे. कारागीर आणि लहान व्यवसायिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. जे लोक पारंपारिक व्यवसाय करतात, ज्यांच्याकडे एखादे कौशल्य आहे अशा व्यक्तींना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली जाणार आहे.

Leave a Comment