Join Whatsapp Group

Join Telegram Group

युनायटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू, पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | UIIC Recruitment 2023

UIIC Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांना कंपनीमार्फत ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. कंपनीद्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, याद्वारे उमेदवारांना लवकरात लवकर त्यांचा फॉर्म भरून घेण्याचे सांगण्यात आले आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाइन आहे, सोबतच या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 100 आहेत. उमेदवारांना दिनांक 14 सप्टेंबर 2023 च्या अगोदर त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावा लागेल. कारण 14 सप्टेंबर 2023 ही युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2023 साठी ची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना या लेखांमध्ये दिलेली माहिती अगोदर वाचून घ्यावी लागेल, आणि नंतरच तुम्हाला योग्य रीतीने भरतीसाठी चा ऑनलाईन फॉर्म भरता येईल.

Table of Contents

UIIC Recruitment 2023 information in Marathi

पदाचे नाव (Name of the Post)  – विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे, सर्व पदांची नावे आणि त्यांचा तपशील हा पुढीलप्रमाणे आहे.

पदाचे नावपदसंख्या
लीगल स्पेशलिस्ट25
अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट24
कंपनी सेक्रेटरी 03
ऍक्च्युअरी 03
डॉक्टर 20
इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स /ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स) 22
ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट 03
Total 100

🙋 Total जागा – एकूण 100 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – [General: 60% गुण, SC/ST: 55% गुण] पदानुसार पात्रता निकष वेगवेगळे आहेत.

पद क्रमांकपात्रता निकष
पद क्र.1: (i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) ICAI/ICWA किंवा 60% गुणांसह B.Com. किंवा M.Com
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ची अंतिम परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी.
पद क्र.4: (i) सांख्यिकी / गणित / एक्चुरियल विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: MBBS / BAMS / BHMS
पद क्र.6: B.Tech./B.E./M.Tech./M.E. (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स)
पद क्र.7: कृषी पदवी/पदव्युत्तर पदवी

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 31 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹250/-]

💰वेतन श्रेणी (Salary) – प्रत्येक पदानुसार वेतन श्रेणी वेगवेगळी आहे.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 14 सप्टेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download करा

How to Apply for UIIC Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? अर्ज प्रक्रिया

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 100 आहेत.

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे, इतर कोणत्याही माध्यमातून सादर केलेला अर्ज हा गृहीत धरल्या जाणार नाही.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना त्यांचा फॉर्म हा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर भरावा लागणार आहे.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 14 सप्टेंबर 2023 आहे, या तारखेच्या आत उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरून घ्यायचा आहे.

सोबतच अर्ज ऑनलाईन स्वरूपात करत असताना, फॉर्ममध्ये कोणते स्वरूपाची खोटी माहिती अथवा अपूर्ण माहिती द्यायची नाही अन्यथा तुमचा अर्ज गृहीत धरल्या जाणार नाही.

भरती संबंधी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर वरील टेबल मध्ये भरतीची जाहिरात PDF दिली आहे. Download करा या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरात वाचू शकता.

Leave a Comment