Join Whatsapp Group

Join Telegram Group

सन्मान धन योजना महाराष्ट्र 2024, या कामगारांना मिळणार 10,000 रुपये! | Sanman Dhan Yojana Maharashtra

Sanman Dhan Yojana: मित्रांनो आता घरकाम करणाऱ्या महिलांना तसेच घरेलु कामगारांना प्रत्येकी 10,000 रुपये एवढी आर्थिक मदत मिळणार आहे, यासाठी राज्य कामगार विभागाद्वारे एका अभिनव अशा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

या अभिनव अशा योजनेचे नाव आहे सन्मान धन योजना महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून आता घरेलु कामगारांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. जर तुम्ही पण घरकाम करत असाल, तर तुम्हाला पण हे 10,000 रुपये मिळू शकतात. 

Table of Contents

Sanman Dhan Yojana Maharashtra

योजनेचे नावSanman Dhan Yojana
सुरुवात महाराष्ट्र सरकार
उद्देशघरकाम करणाऱ्या महिलांना, घरेलु कामगारांना आर्थिक आर्थिक मदत करणे.
लाभार्थीमहाराष्ट्रातील नोंदणीकृत घरेलु कामगार 
लाभ10,000 रुपयांची आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळmahabocw.in

Sanman Dhan Yojana पात्रता निकष

सन्मान धन योजना साठी पात्रता निकष हे सांगण्यात आले आहेत, त्यानुसार जे घरेलु कामगार उमेदवार पात्र असतील त्यांना कामगार विभागाद्वारे प्रत्येकी 10,000 रुपये दिले जाणार आहेत.

Sanman Dhan Yojana

सन्मान धन योजना पात्रता निकष पुढीलप्रमाणे:

  • अर्जदार व्यक्तीचे वय हे 31 डिसेंबर रोजी 55 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झालेले असावे. (दर वर्षी 31 डिसेंबर रोजी 55 वर्ष वय झालेल्या घरेलु कामगारांना लागू)
  • अर्जदार व्यक्ती हा बांधकाम कामगार विभाग अंतर्गत महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत कामगार असावा. 
  • सन्मान धन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा हयात असावा, जर नसेल तर लाभ भेटत नाही.
  • यापूर्वी लाभ घेतलेल्या अर्जदारांना पुन्हा या सन्मान धन योजनेद्वारे लाभ मिळणार नाही, सदर योजनेसाठी असे अर्जदार पात्र नसतील.

Sanman Dhan Yojana GR शासन निर्णय

राज्य सरकारने नव्याने या Sanman Dhan Yojana साठी शासन निर्णय GR निर्गमित केला आहे, त्यानुसार सर्व घरेलु कामगारांना त्यांच्या वयाच्या 55 व्या वर्षी 10,000 रूपयांची मदत केली जाणार आहे.

शासन निर्णयामध्ये योजनेसाठी अर्ज कोठे करायचा? पात्रता निकष काय आहेत? अटी कोण कोणत्या आहेत? आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया काय आहे? अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली गेली आहे, तुम्हाला जर Sanman Dhan Yojana GR वाचायचा असेल तर येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि योजनेचा शासन निर्णय सविस्तर वाचा.

Sanman Dhan Yojana Application Form (अर्ज प्रक्रिया)

Sanman Dhan Yojana साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपाची आहे, त्यासाठी पात्र घरेलु कामगार जिल्हास्तरावरील समन्वय विकास आयुक्त (असंघटित कामगार) किंवा महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळात जाऊन या सन्मान धन योजनेसाठी अर्ज सादर करू शकतो.

योजनेच्या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे, सूचनेनुसार आवश्यक ते कागदपत्रे देखील फॉर्म सोबत जोडायचे आहेत, आणि योजनेसाठी अर्ज करायचा आहे.

जर तुमचे वय 55 वर्षे असेल तर तुम्ही घरेलु कामगार कल्याण मंडळात नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, ज्यांची नोंदणी असेल त्यांनाच Sanman Dhan Yojana चा लाभ मिळणार आहे.

जर तुम्हाला या Sanman Dhan Yojana विषयी कोणत्याही स्वरूपाची माहिती पाहिजे असं, किंवा तुमचे काही प्रश्न असतील, तर येथे खाली कमेंट करा किंवा आमचा WhatsApp Group जॉईन करा.

Leave a Comment