Join Whatsapp Group

Join Telegram Group

अयोध्या राम मंदिर संपूर्ण माहिती | Ram Mandir Information In Marathi

जय श्री राम 🚩 मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण राम मंदिरा संबंधित (Ram Mandir Information In Marathi) संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

या लेखामध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या राम मंदिराची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

राम मंदिराची रचना कशी आहे? कोणते दगड बांधकामासाठी वापरेल आहेत? मंदिरासाठी खर्च किती झाला? कोणत्या कंपनीने राम मंदिर बांधले? (Ram Mandir Ayodhya Information In Marathi) अशा सर्व महत्वाच्या बाबी सविस्तर रित्या सांगण्यात आल्या आहेत. 

राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही केव्हा, आणि कसे जाऊ शकता याची माहिती देखील देण्यात आली आहे. 

ram mandir

Ayodhya Ram Mandir Information In Marathi

500 हून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर, आता अखेर आपल्या श्री रामांचे अयोध्येत राम मंदिर बनते आहे. कायदेशीर आणि राजकीय लढाई नंतर राम मंदिर अखेर पूर्णत्वास येते आहे. 

न भूतो न भविष्यती असे नागर शैलीतील राम मंदिर पुढील 800 ते 1000 वर्षांपर्यंत टिकणार आहे. देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारे राम मंदिर बांधले जात आहे. 

कोणार्क मंदिराप्रमाणे राम मंदिराची रचना असणार आहे, कोणत्याही स्वरूपाचं स्टील अथवा सिमेंट मंदिराच्या बांधकामात वापरले गेले नाही.

राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ठीक दुपारी 12 वाजता प्रभू श्री रामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. (या प्रकारचे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील, प्राचीन महालक्ष्मी मंदिरात आहे)

हे पण वाचा: चांद्रयान 3 संपूर्ण माहिती मराठी

श्रीराम मंदिराची संपूर्ण माहिती

ram mandir mahiti
 • राम मंदिर हे नागर शैलीत बांधले आहे.
 • मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 380 फूट आणि रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.
 • मंदिर 3 मजली आहे, प्रत्येक मजला 20 फुटांचा आहे. 
 • मंदिराला 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत.
 • भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालमुर्ती स्थित आहे, प्रथमतल गर्भगृहात श्रीराम दरबार आहे.
 • नृत्य मंडप, रंग मंडप, गूढ मंडप (सभा मंडप), प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण 5 मंडप आहेत.
 • खांबावर तसेच भिंतीवर विविध देवीदेवतांचे तसेच देवांगणांच्या मुर्त्या आहेत.
 • मंदिरात 32 पायऱ्या चढून (16.5 फूट उंच) पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल.
 • दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प तसेच लिफ्टची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
 • मंदिराच्या चहूबाजूस आयताकृती प्राकार आहे, त्याची लांबी 732 मीटर आणि रुंदी 4.25 मीटर आहे. प्राकाराच्या चारही कोपऱ्यात चार मंदिरे आहेत. त्यामध्ये भगवान सूर्य, भगवान शंकर, गणपती, देवी भागवती तसेच दक्षिण बाजूस प्रभू श्री हनुमान आणि उत्तरेस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे.
 • राम मंदिराजवळ पौराणिक काळातील सिताकुप आहे.
 • श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्ती, निषदराज गुह, माता शबरी आणि देवी अहिल्या माता यांची मंदिरे प्रस्तावित आहेत. (पुढील काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल)
 • सोबतच मंदिराच्या नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर टीला येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार तसेच रामभक्त श्री जटायू यांची स्थापना देखील करण्यात येणार आहे.

राम मंदिर संबधीत काही महत्वाचे प्रश्न

श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती कोणत्या दगडाची बनवण्यात आली आहे?

श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती शाळिग्राम या पवित्र दगडापासून बनवण्यात आली आहे. 

शाळिग्राम दगडात श्री विष्णू विराजमान असतात, त्यामुळे मूर्ती साठी हा दगड नेपाळ मधून मागवण्यात आला आहे.

राम मंदिर अयोध्येत कोणता दगड वापरला आहे?

राम मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थान मधील लाल आणि पांढरा दगड वापरला गेला आहे. हा दगड हजारो वर्ष टिकतो, त्यामुळे या दगडाची निवड करण्यात आली आहे.

राम मंदिरासाठी किती पैसा खर्च झाला?

राम मंदिरासाठी एकूण खर्च 1800 कोटी रुपये होणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराची किंमत किती?

राम मंदिराची किंमत ही 1800 कोटी पेक्षा अधिक आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी अजून खर्च होणार आहे.

राम मंदिर कोणत्या कंपनीने बांधले?

राम मंदिराचे बांधकाम हे टाटा समूह आणि आघाडीची बांधकाम कंपनी एल अँड टी द्वारे करण्यात आले आहे.

राम मंदिर जनतेसाठी कधी खुले होणार?

24 जानेवारी 2024 पासून राम मंदिर जनतेसाठी खुले होणार आहे.

राम मंदिर अयोध्येत कसे जायचे?

राम मंदिर दर्शनासाठी तुम्ही रेल्वे मार्गाद्वारे जाऊ शकता, महाराष्ट्रातून अयोधे साठी थेट रेल्वे आहेत. त्यामुळे रेल्वेतून तुम्ही जाऊ शकता, सोबतच विमानातून देखील राम मंदिर अयोध्या येथे तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता.

मित्रांनो भगवान श्री रामांचे राम मंदिर आपल्या हयातीत निर्माण झाले याचा गर्व बाळगा, कारण राम मंदिरासाठी कित्येक पिढ्या लढल्या तेव्हा हे राम मंदिर प्रत्यक्षात बनू शकले आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत, 500 वर्षांचा हा संघर्ष आहे.

22 जानेवारी 2024 ला श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यामुळे या 22 जानेवारी ला देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोठा अपूर्व असा सोहळा होणार आहे, ज्याने सर्व राम भक्तांचे डोळे दिपून निघणार आहेत.

तर मित्रांनो ही होती राम मंदिराची संपूर्ण माहिती {Ram Mandir Information In Marathi} मला आशा आहे, तुम्हाला ही माहिती आवडली असेल.

Leave a Comment