Join Whatsapp Group

Join Telegram Group

पोलीस भरती कागदपत्रे 2024 लिस्ट, जाणून घ्या कोणती डॉक्युमेंट लागणार? Police Bharti Document List

Police Bharti Document List: नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी अर्ज सुरू झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला जर पोलीस भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागणार? हे जाणून घेणं आवश्यक आहे.

सोबतच Maharashtra Police Bharti मैदानी चाचणी साठी देखील कागदपत्रे लागतात, चाचणी घेताना उमेदवारांचे सर्व आवश्यक कागदपत्रे तपासले जातात. तसेच पोलिस भरती साठी लागणारी जी कागदपत्रे आहेत, त्यांची पडताळणी सुध्दा होणार आहे.

जर तुमच्या कडे Police Bharti Required Documents नसतील तर मैदानी चाचणी वेळी कागदपत्रे जमा करायला तुमच्या नाकी नऊ येतील. त्यामुळे Police Bharti Ground Test चाचणी च्या अगोदरच आवश्यक ते सर्व कागदपत्रे काढून घ्या.

भरती साठी तुम्ही एवढी मेहनत केली असते, पण एका चुकी मुळे तुमची मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे या आर्टिकल मध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे काढून ठेवा, म्हणजे तुम्ही कोणत्याही अडचणी विना पोलीस भरती साठी पात्र होऊ शकाल.

मुलींना मिळणार 50,000 रुपये! मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र

पोलीस भरती कागदपत्रे 2024

मित्रांनो पोलीस भरती साठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे आणि पोलीस भरती मैदानी चाचणी वेळी लागणारी कागदपत्रे त्यांची लिस्ट आपण आता पाहणार आहोत.

पोलीस भरती फॉर्म कागदपत्रे

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना आवश्यक ते कागदपत्रे डोकमेंट्स फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत.

अर्जामध्ये अपलोड करायचे कागदपत्रे हे Soft Copy स्वरूपात असावेत, म्हणजे तुम्हाला या कागदपत्रांची फोटो काढून किंवा Scan करून ते अर्ज भरताना अपलोड करायचे आहेत.

पोलीस भरती ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता देखील टाकावी लागते, Education Qualification चे डॉक्युमेंट्स लागणार नाहीत, पण त्यांची माहिती फॉर्म मध्ये भरावी लागणार आहे. त्यामुळे अर्ज करताना सर्व कागदपत्रे सोबत बाळगा, आणि जे लागतील त्यांची माहिती अर्जात टाकून द्या.

ऑनलाइन अर्ज करताना केवळ दोन Document लागतात, जे की अपलोड करायचे असतात. ते कोणते आहेत, हे आपण आता पाहूया.

 • उमेदवार अर्जदाराचा चालू वर्षातील पासपोर्ट फोटो
 • उमेदवाराची सही स्वाक्षरी किंवा अंगठा

हे दोन्ही कागदपत्रे फॉर्म भरताना योग्य दिलेल्या Size मध्ये अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही हे कागदपत्रे अपलोड केले नाही तर तुमचा पोलीस भरती फॉर्म पुढेच जाणार नाही.

पोलीस भरती मैदानी चाचणी कागदपत्रे

पोलीस भरतीसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी, Ground Test घेतली जाते, त्यावेळी सर्व सहभागी अर्जदारांचे कागदपत्रे तपासले जातात. त्याचवेळी अर्जदारांचे डॉक्युमेंट अधिकाऱ्याद्वारे पडताळणी केली जाते. 

जर एखादे कागदपत्र कमी असेल तर उमेदवाराला त्याची पूर्तता करणे लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. जर उमेदवाराने दिलेल्या वेळेमध्ये कागदपत्र सादर केले नाहीत, तर उमेदवाराचा अर्ज हा बाद केला जाऊ शकतो.

पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • 10 वी पास मार्कशीट
 • 12 वी पास मार्कशीट
 • शाळा सोडल्याचा दाखला टीसी (TC)
 • शाळेत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
 • पदवी परीक्षेचे गुणपत्रक (पदवीधर असल्यास)
 • मुक्त विद्यापीठ पदवी परीक्षा गुणपत्रक
 • पदव्युत्तर पदवी असल्यास त्याची मार्कशीट
 • ITI डिप्लोमा असेल तर मार्कशीट
 • कास्ट सर्टिफिकेट
 • वयाचा पुरावा (दाखला)
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
 • आर्थिक दृष्ट्या द्रुबल असेल तर EWS प्रमाणपत्र
 • महिलांसाठी 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र
 • महिलांचे लग्न झाले असे तर नावाची गॅझेट कॉपी
 • भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
 • प्रकल्पग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
 • खेळाडू प्रमाणपत्र
 • वडील पोलीस असल्यास प्रमाणपत्र
 • होमगार्ड प्रमाणपत्र
 • माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र
 • माजी सैनिक आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

थोडक्यात एवढे सगळे कागदपत्रे अर्जदारांना पोलीस भरतीसाठी लागणार आहेत, पण यातील बरचसे कागदपत्रे हे सर्व अर्जदारांना लागू असणार नाहीत. त्यामुळे तुमच्यासाठी कोणते कागदपत्रे लागू आहेत, तेच कागदपत्रे तुम्हाला मैदानी चाचणी वेळी सोबत घेऊन जायचे आहेत.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे हे Soft Copy मध्ये सुध्दा सोबत ठेवायचे आहेत, तुम्ही ते तुमच्या मोबाईल वर Scan करून ठेऊ शकता.

त्याचबरोबर Police Bharti साठी Required Documents हे Hard Copy स्वरूपात म्हणजेच Orignal Documents देखील सोबत ठेवायचे आहेत.

ज्यावेळी तुम्हाला मैदानी चाचणी वेळी कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल तेव्हा ही कागदपत्रे सादर करायची आहेत. जर पोलीस भरती साठी लागणारे सर्व कागदपत्रे असतील तर तुम्हाला मैदानी चाचणी मध्ये त्याचा फायदा होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ७,२०० रू. अर्ज करा, संजय गांधी निराधार योजना

Police Bharti Document List FAQ

पोलीस भरतीसाठी काय काय कागदपत्रे लागतात?

पोलीस भरती साठी बरेचसे कागदपत्रे लागतात, त्याची List मी या लेखामध्ये दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची तारीख काय आहे?

पोलीस भरती 2024 साठी अर्ज हे 5 मार्च, 2024 पासून सुरू झाले आहेत, Last Date 31 मार्च, 2024 आहे.

पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म साठी कोणते कागदपत्रे लागणार?

पोलीस भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना त्यांचा पासपोर्ट फोटो आणि सही (स्वाक्षरी) अपलोड करायची आहे.

2 thoughts on “पोलीस भरती कागदपत्रे 2024 लिस्ट, जाणून घ्या कोणती डॉक्युमेंट लागणार? Police Bharti Document List”

Leave a Comment