Join Whatsapp Group

Join Telegram Group

बेरोजगारांना शासन देणार 50 लाखांचे कर्ज! जाणून घ्या संपूर्ण माहिती | PMEGP Loan Yojana 2024 In Marathi

मित्रांनो PMEGP Loan Yojana अंतर्गत बेरोजगार तरुणांना तब्बल 50 लाख रुपयांचे कर्ज शासन मिळणार आहे. शासनाद्वारे प्रधानमंत्री रोजगार योजने मार्फत ही PMEGP Loan Yojana सुरू करण्यात आली आहे.

तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार तरुण असाल, आणि तुम्हाला पण स्वतःच्या पायावर उभं राहुन, एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल; तर शासन आता स्वतः हुन आर्थिक मदत देणार आहे.

नवीन रुपात PMEGP Loan Yojana सुरू झाली आहे, विशेष बाब म्हणजे 20 लाख ते 50 लाख रुपयांचे कर्ज (Loan) या योजने अंतर्गत दिले जाणार आहे.

PMEGP Loan योजनेचा लाभ कसा मिळवायचा? अर्ज प्रक्रिया काय आहे? कोण कोणते कागदपत्रे लागणार? अशी सर्व माहिती या लेखामध्ये दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि या शासनाद्वारे Business Loan घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा.

PMEGP Loan Yojana 2024 In Marathi

PMEGP Loan Yojana मार्फत आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांना कर्ज (Business Loan) दिले जाणार आहे. 20 लाख ते 50 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024

Pmegp कर्जासाठी कोण पात्र आहे?

Pmegp कर्ज योजना ही केंद्र सरकार द्वारे राबवली जाते, या योजनेचा फायदा हा सर्व स्तरातील लोक घेऊ शकतात.

जे लोक सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना या Pmegp योजनेचा लाभ दिला जातो, उमेदवार हा बेरोजगार असावा, त्याची आर्थिक स्थिती कमकुवत असावी; असे सर्व बेरोजगार तरुण pmegp loan कर्जासाठी पात्र असणार आहेत.

Pmegp साठी कोण अर्ज करू शकतो?

Pmegp loan साठी सर्व स्तरातील बेरोजगार तरुण अर्ज करू शकतात, परंतु उमेदवारांचे वय मात्र 18 वर्षा पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

जे उमेदवार 18 वर्षा पेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. 

PMEGP उद्योग लिस्ट 

PMEGP योजने अंतर्गत येणारे व्यवसाय:

 • कृषी अन्न प्रक्रिया व्यवसाय
 • सिमेंट आणि संबंधित उत्पादने 
 • रसायने/पॉलीमर आणि खनिजे 
 • कोल्ड स्टोरेज आणि चेन सोल्युशन 
 • दुग्धजन्य पदार्थ 
 • इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणे 
 • अन्न प्रक्रिया उद्योग 
 • वन उद्योग 
 • फलोत्पादन – सेंद्रिय शेती 
 • कागद आणि संबंधित उत्पादने 
 • प्लास्टिक आणि संबंधित सेवा 
 • सेवा क्षेत्रातील उद्योग 
 • लहान व्यवसाय मॉडेल 
 • कापड आणि पोशाख 
 • कचरा व्यवस्थापन   

PMEGP Loan Yojana Documents (कागदपत्रे)

Pmegp योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:

 1. पॅनकार्ड  
 2. आधार कार्ड 
 3. कास्ट सर्टिफिकेट 
 4. रहिवासी प्रमाणपत्र 
 5. शैक्षणिक प्रमाणपत्र 
 6. मोबाइल नंबर 
 7. पासपोर्ट आकाराचा फोटो 

वरील सर्व कागदपत्रे हे अर्जदार उमेदवाराचे असावेत, इतर कोणाचेही कागदपत्रे वैध राहणार नाहीत.

बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र 2024

PMEGP Loan Yojana Apply Online (अर्ज प्रक्रिया)

PMEGP Loan Yojana साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. जे उमेदवार कर्ज घेण्यास तयार आहेत, आणि ते पात्रता निकषांमध्ये येतात; फक्त अशाच अर्जदारांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

सर्वप्रथम @www.kviconline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, तेथे तुम्हाला PMEGP Loan Yojana 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा Option दिसेल, त्यावर क्लिक करा.

योजनेचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये आवश्यक अशी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाका. अचूक रित्या फॉर्म भरणे अपेक्षित आहे.

वर सांगितलेले सर्व कागदपत्रे सोबत ठेवून, आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. Hard Copy आणि Soft Copy स्वरूपात Document तयार ठेवायचे आहेत.

फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यावर, जर उमेदवार पात्र असेल तर त्याला; PMEGP Loan Yojana द्वारे 20 लाखा पासून 50 लाखा पर्यंत कर्ज मिळते.

Leave a Comment