Join Whatsapp Group

Join Telegram Group

आता घर बांधण्यासाठी मिळणार मोफत वाळू! राज्य शासनाचा नवीन निर्णय, लगेच अर्ज करा | Online Valu Booking Maharashtra

Online Valu Booking Maharashtra: मित्रांनो आता राज्य शासन सर्वांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू देणार आहे, यासंबंधी अधिकृत निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

सामान्य नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक अशी बाब आहे, सरकार पात्र लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत रेती, वाळू देणार आहे. त्यासाठी व्यक्तीला ऑनलाईन स्वरूपात वाळू बुकिंग करावी लागणार आहे, तरच मोफत वाळूचा लाभ भेटणार आहे.

राज्य शासनाचा हा अभिनव असा निर्णय नक्कीच सामान्य नागरिकांना फायद्याचा ठरणार आहे. आता आपण पाहतो, पूर्वी पेक्षा किती पटीने वाळूचे दर वाढलेत! हे वाढणारे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत, हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मोफत वाळू योजना सुरू केली आहे.

मोफत वाळू मिळवण्यासाठी कोण पात्र असणार? पात्रता निकष काय आहेत? अर्ज कसा करायचा? Online Valu Booking कशी करायची? अशी सर्व आवश्यक माहिती या लेखामध्ये मी दिली आहे. 

जर तुम्हाला या Mofat Online Valu Booking Maharashtra योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा, जरी सद्या तुमचे घर बांधण्यासाठी काढले नसेल, तरी पण ही माहिती जाणून घ्या, म्हणजे भविष्यात तुमचा मोठा खर्च वाचेल.

Online Valu Booking Maharashtra

अवैध वाळूची वाहतूक आणि बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी राज्य सरकार मार्फत सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्या द्वारे सरकार नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार Online Valu Booking ची सुविधा देणार आहे.

सोबतच गरजू, गरीब, मध्यमवर्गीय लोकांना घर बांधण्यासाठी वाळू किंवा रेती ही अगदी फुकट मोफत दिली जाणार आहे. याची अधिकृत घोषणा शिंदे सरकार मार्फत मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.

‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर वाळू विक्री होणार आहे, तसेच त्यांचे दर देखील माफक ठेवण्यात येणार आहेत. संबंधित जिल्हास्तरीय Authority द्वारे नदी पात्र किंवा खाडी पत्रातून उपसा केलेल्या रेती चे अंतिम दर ठरवण्यात येणार आहेत.

Online Valu Booking New Rate

राज्य शासना कडून Online Valu Booking Maharashtra ही सुविधा सुरू करण्यात आली आहे, त्यानुसार जिल्ह्यातील वाळू डेपो मधून सामान्य नागरिकांना माफक दरात वाळू मिळणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या नवीन निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेशासाठी वाळूचे दर हे प्रती ब्रास 1200 रुपये असणार आहेत, तर हे दर प्रति मॅट्रिक टन 267 रूपया नुसार लागू होणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश वगळून राज्यातील इतर प्रदेशासाठी जसे पुणे, नागपूर, नाशिक आणि इतर जिल्हे यांच्यासाठी सुधारित रेती दर हे 600 रुपये प्रति ब्रास असणार आहेत, आणि हे दर प्रति मॅट्रिक टन 133 रूपया नुसार लागू होणार आहेत.

कोणाला मोफत वाळू मिळणार?

नवीन निर्णयानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या आवास योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकार मोफत वाळू देणार आहे. 

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला घरकुल मंजूर झाले ते त्या घरकुलाच्या बांधकामासाठी जेवढी वाळू रेती लागेल तेवढी तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे.

घरकुलाचे पैसे तर सरकार देते, सोबतच मोफत वाळू मिळत असल्याने तुमचा खर्च हा बऱ्या अंशी कमी होणार आहे. ज्याचा मोठा फायदा गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना होईल.

किती मोफत वाळू मिळणार?

नवीन वाळू विक्री सुधारणा विधेयकानुसार वर सांगितल्या प्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत वाळू आणि रेती मिळणार आहे.

शासकीय घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांचे घर बांधण्यासाठी एकूण 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे, म्हणजे 22.5 मॅट्रिक टन पर्यंत वाळू फ्री मध्ये मिळणार आहे.

लाभार्थ्यांना केवळ वाळू डेपोतून नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च करावा लागेल, याव्यतिरिक्त कोणताही खर्च येणार नाही. 

जर घरकुल बांधण्यासाठी 5 ब्रास वाळू कमी पडत असेल, आणि तुम्हाला अजून वाळूची गरज असेल तर 600 रुपये प्रति ब्रास प्रमाणे 5 किंवा 10 ब्रास वाळू अगदी माफक अशा किंमतीत 3000 ते 6000 रुपयात मिळते.

Online Valu Booking Maharashtra Form

Online Valu Booking

सरकार कडून माफक दरात तसेच मोफत वाळू मिळवण्यासाठी Online Valu Booking करणे अनिवार्य आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे.

Online Valu Booking Official Website ची लिंक लेखामध्ये दिली आहे. निळ्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला जेवढी वाळू लागणार आहे, तेवढ्या वाळू साठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

मोफत वाळू मिळवण्यासाठी सुध्दा लाभार्थी व्यक्तींना Online Valu Booking करावी लागणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याच्या वाळू डेपो मधून तुम्ही बुक केलेली वाळू मिळवू शकता.

Online Valu Booking साठी Form भरताना दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे. आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

तुम्ही जर शासकीय घरकुल लाभार्थी असाल, तर तुम्हाला त्या संबंधी आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. आणि जेवढी ब्रास वाळू पाहिजे असेल, तेवढ्या वाळू साठी ऑनलाईन बुकींग करायची आहे.

Online Valu Booking केल्यावर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या वाळू डेपो मध्ये चौकशी करायची आहे. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्ही डेपोतून वाळू प्राप्त करू शकता.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही Online Valu Booking करू शकता, सोबतच mofat valu चा लाभ घेऊ शकता. मला आशा आहे, तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला Online Valu Booking Maharashtra संबंधी कोणतीही अडचण येत असेल, तर आम्हाला येथे कमेंट करा. किंवा आमचा Telegram Group जॉईन करा.

Leave a Comment