Join Whatsapp Group

Join Telegram Group

12 वी पास मुलींना मिळणार न्यूयॉर्कमध्ये स्कॉलरशिप! पदवी शिक्षण फ्री, लगेच अर्ज करा

New York University Scholership 2024: राज्यातील 12 वी पास मुलींना न्यूयॉर्क मध्ये पदवी शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

या संदर्भात न्यूयॉर्क येथील ‘बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज’ (बीएमसीसी) यांच्याद्वारे महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना 12 वी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) देण्याचे जाहीर केले आहे.

महिलांचे सबलीकरण व्हावे, शिक्षणापासून त्या वंचित राहू नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हे scholership चे प्रोग्राम आयोजित केले आहेत.

आर्थिक परिस्थितीमुळे मुलींचे 12 वी नंतरचे शिक्षण बंद पडू नये, यासाठी गुणवंत विद्यार्थिनींना New York University द्वारे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

न्यूयॉर्क शिष्यवृत्ती योजना 2024

या शिष्यवृत्ती द्वारे महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्क मधील कॉलेज मध्ये Scholership दिली जाणार आहे.

New York University Scholership 2024

ज्या विद्यार्थिनींना Scholership साठी Apply केलं आहे, त्यातील गुणवंत अशा पहिल्या 10 मुलींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी New York मधील महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024

या अभिनव अशा योजने मुळे महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे द्वार खुले होणार आहे. 

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतः या New York University Scholership 2024 ची घोषणा केली आहे.

सोबतच अजून एक Scholership Yojana सुरू करण्यात येणार असल्याचे देखील शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले आहे. यामध्ये जर्मनी मधील महाविद्यालयात शिक्षण घेण्याची संधी दिली जाणार आहे.

न्यूयॉर्क शिष्यवृत्ती साठी अर्ज कसा करायचा?

न्यूयॉर्क शिष्यवृत्ती योजना ही ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे, न्यूयॉर्क मधील ‘बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज’ सोबत महाराष्ट्र शिक्षण विभागाद्वारे करण्यात आलेल्या करारानुसार राज्यातील विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती ऑगस्ट 2024 पासून देण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती साठी अर्ज कसा करायचा? याची प्रोसेस पुढीलप्रमाणे आहे:

या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी मुंबई मधील जुहू स्थित ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (SNDT) येथे संपर्क करावा.

विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट आहे, अधिक माहितीसाठी विद्यार्थिनींनी कृपया www.bmcc.cuny.edu/apply या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकेतस्थळावर या शिष्यवृत्ती योजने संबंधित सर्व माहिती दिलेली आहे, माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. आणि दिलेल्या सूचनांचे पालन करून त्या प्रकारे शिष्यवृत्ती साठी अर्ज सादर करा.

शिष्यवृत्ती द्वारे कोणता लाभ मिळणार?

या शिष्यवृत्ती द्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींचा (First Year) पहिल्या वर्षाचा ट्युशन खर्च न्यूयॉर्क मधील ‘बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज’ उचलणार आहे. 

प्रधानमंत्री बेरोजगार कर्ज योजना 2024

यामुळे विद्यार्थिनींना कोणताही आर्थिक खर्च करण्याची गरज राहणार नाही, शून्य रुपयात अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.

ही शिष्यवृत्ती केवळ 10 विद्यार्थिनींना देण्यात येणार आहे, दहा विद्यार्थिनींची निवड ही विविध निकषांच्या आधारे केली जाणार आहे.

अभ्यासक्रमादरम्यान शिष्यवृत्तीप्राप्त दहा विद्यार्थिनींना राहण्याच्या तसेच इतर खर्चातही सवलत देण्यात येणार आहे.

जर तुम्ही 12 मध्ये सध्या शिकत आहात, किंवा तुमची 12 वी झाली असेल, अथवा तुमच्या ओळखी मधील कोणी 12 वी ची विद्यार्थिनी असेल तर कृपया त्यांना ही माहिती जरूर सांगा. जेणेकरून त्यांना 12 वी नंतरच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल.

Leave a Comment