Join Whatsapp Group

Join Telegram Group

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 संपूर्ण माहिती | Nanded Police Patil Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, आजच्या या जॉब पोस्ट मध्ये आपण Nanded Police Patil Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नांदेड पोलीस पाटील भरती साठी अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय आहे? शेवटची तारीख कोणती? रिक्त जागा किती? तालुक्या नुसार जागा किती? अशा सर्व बाबी विषयी पुर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे.

Nanded Police Patil Recruitment संबंधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकूण 745 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, या नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्या साठी अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे, केवळ त्याच Official Website वरून फॉर्म भरता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 जानेवारी 2024 आहे, दिनांक 1 जानेवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.

म्हणजे केवळ 8 दिवस अर्ज करण्यासाठी मुदत असणार आहे, त्यांनतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

हे पण वाचा: अयोध्या राम मंदिर संपूर्ण माहिती मराठी, जाणून घ्या सविस्तर

Nanded Police Patil Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – पोलीस पाटील

🙋 Total जागा – एकूण 745 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी पास झालेले असावे. तसेच उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नांदेड (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट: 25 ते 45 वर्षे (वयोमर्यादा कोणत्याही प्रवर्गासाठी शिथिल केली गेली नाहीये)

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open प्रवर्ग: ₹800/- [मागासवर्ग /EWS: ₹700/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 08 जानेवारी 2024

✍️ लेखी परीक्षा (Writeen Test) – 14 जानेवारी 2024

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Online
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

Nanded Police Patil Recruitment 2023 /24 जिल्हानिहाय पद संख्या

नांदेड पोलीस पाटील भरती साठी जिल्हा निहाय पद संख्या तुम्हाला जर पहायची असेल, भरती साठी जारी करण्यात आलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. 

जाहिरातीच्या शेवटी नांदेड पोलीस पाटील गावनिहाय आणि तालुका निहाय पद संख्या दिलेली आहे. 

हे पण वाचा: लातूर महानगरपालिका भरती, नोकरीची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा

यामधे आरक्षण कोणाला आहे, कोणाला नाही याची पण माहिती दिलेली आहे.

तुम्ही जाहिराती मध्ये तुमचा तालुका निवडून, गावा नुसार लिस्ट पाहू शकता.

Nanded Police Patil Bharti 2024 Apply Online

नांदेड पोलीस पाटील भरती साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, फॉर्म भरण्यासाठी केवळ 8 दिवस आहेत.

नांदेड पोलीस पाटील भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. 

nanded police patil bharti 2024

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वर टेबल मध्ये Official Link दिली आहे, Apply Online वर क्लिक करून तुम्ही अर्ज सादर करू शकता.

भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना, उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. अर्ज हा अचूक भरला गेला पाहिजे, अन्यथा तो बाद केला जाऊ शकतो.

फॉर्म भरताना उमेदवारांना आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, मुख्य स्वरूपात कागदपत्रे हे उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी आहे. 

अर्ज भरल्यानंतर वेबसाईट च्या होमपेजवर येऊन, भरतीसाठी परीक्षा फी भरायची आहे. फी ही Open साठी 800 रू. आहे, तर मागासवर्गीय EWS साठी 700 रू. फी भरायची आहे.

फॉर्म पूर्ण भरून झाला की नंतरच Submit करायचा आहे, त्याअगोदर सबमिट करायचे नाही, एकदा अर्ज तपासून पाहायचा आहे.

नांदेड पोलीस पाटील भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 जानेवारी 2024 आहे. 

हे पण वाचा: आयुष्यमान भारत कार्ड, 5 लाख रुपयांचा फायदा! लगेच पाहून घ्या

दिनांक 09 जानेवारी 2024 ला ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत, त्यांचे अर्ज तपासले जाणार आहेत.

त्यांनतर दिनांक 10 जानेवारी 2024 ला उमेदवारांचे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिध्द केले जाणार आहे. (उमेदवार प्रवेशपत्र हे वेबसाईट वर जाऊन Download करू शकतो)

दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी नांदेड पोलीस पाटील भरती साठीची, प्रत्यक्ष लेखी परीक्षा पार पडणार आहे.

दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची लिस्ट लागणार आहे, आणि त्यांना मुलाखती साठी बोलवेले जाणार आहे.

मुलाखती मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील, त्यांना पोलीस पाटील या पदावर नियुक्त केले जाणार आहे. 

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 चा निकाल हा दिनांक 16 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान लागू शकतो. (यासंबधी लेटेस्ट अपडेट आम्ही येथे देऊ)

Leave a Comment