Join Whatsapp Group

Join Telegram Group

नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही? हे एकच काम करा, लगेच खात्यावर पैसे येतील | Namo Shekari Yojana 2024

शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अजून पण Namo Shekari Yojana चा कोणताही हप्ता भेटला नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त हे एकच काम करा, लगेच तुमच्या खात्यावर नमो’ चे पैसे येतील.

यात अजून एक आनंदाची खुशखबरी म्हणजे! Namo Shetakri Yojana 2024 दुसरा हप्ता देखील, हे एक काम केलं तर मिळणार आहे. पण जर तुम्ही हे काम केलं नाही, तर तुम्हाला Namo Shekari Yojana (Installment) हप्ते मिळणार नाहीत.

त्यामुळे जर तुम्हाला एकदाच 4000 रू. हवे असतील तर या लेखामध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि सांगण्यात आलेले काम सुरुवातीला पूर्ण करा, किंवा त्याची खात्री करून घ्या. 

Namo Shekari Yojana 2024

राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात स्वतः माहिती दिलेली आहे. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना अद्याप नमो’ चे पैसे भेटले नाहीत, त्यांना उद्देशून आवाहन केले आहे.

सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सर्व हप्त्यांचे पैसे हे केवळ Aadhar Link Bank खात्यात DBT द्वारे जमा केले जाणार आहेत.

हे पण वाचा 👉 तरुणांना मिळणार वर्षाला 60000 रू. संधी सोडू नका! त्वरित फॉर्म भरा

आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे हे जाणून घ्या. जर ते बँक खाते Active नसेल म्हणजेच बंद असेल, तर मात्र काळजी करण्याचे कारण आहे. आणि खाते बंद नसेल तर कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.

PM Kisan Yojana सोबतच Namo Shetkari Yojana शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही DBT च्या स्वरूपात देते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार नंबर ला जे बँक खाते लिंक आहे त्यावरच पैसे पाठवले जातात. 

म्हणून जर ते बँक खाते बंद असेल, तर कदाचित त्यामुळे तुम्हाला Namo Shetkari Yojana Maharashtra Installment हप्ते मिळाले नसतील.

पैसे मिळत नसतील तर हे काम करा

Namo Shekari Yojana

यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे पोस्ट ऑफिस च्या बँकेत खाते उघडणे. पोस्टात जर शेतकऱ्यांचे खाते असेल तर त्या खात्यावर पैसे पाठवले जातात, यामुळे तुमचे आगोदरचे बँक खाते बंद जरी झाले तरी योजनेचे हप्ते थेट पोस्टाच्या बँक खात्यात जमा केले जातात.

हे पण वाचा 👉 लाडली बहना योजना महाराष्ट्रात सुरू होणार! महिलांना मिळणार फायदा, पहा माहिती

म्हणून जर तुम्हाला अजून पर्यंत Namo Shetkari Yojana चा हप्ता भेटला नाही, तर वर सांगितलेले काम त्वरित करून घ्या. बँक खाते Regular चालू आहे का चेक करा, आणि नसेल खाते बंद झाले असेल तर पोस्टात जाऊन नवीन एक बँक खाते उघडा.

पोस्टात बँक खाते उघडल्यावर, पोस्ट बँकेचे कर्मचारी तुमचे आधार पोस्टाच्या बँकेला लिंक करतात. यामुळे तुमचे जेवढे हप्ते रुकले आहेत ते सर्व या पोस्टाच्या बँक खात्यात जमा केले जातील.

थोडक्यात अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो तुम्ही न मिळालेला ‘नमो शेतकरी योजनेचा हप्ता’ लागलीच फक्त एक काम करून मिळवू शकता.

Leave a Comment