Join Whatsapp Group

Join Telegram Group

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024, ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, जाणून घ्या संपूर्ण माहिती |Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana: मित्रांनो राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता सरसकट ३ हजार रुपये मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येक वर्षाला राज्य शासन एवढी आर्थिक मदत करणार आहे.

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे, त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, या योजनेची अंमलबजावणी पण सुरू झाली आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra साठी कोण पात्र असणार? फायदे काय काय मिळणार? अर्ज कसा करायचा? अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे. काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पण याचा लाभ घेता येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र

योजनेचे नाव Mukhyamantri Vayoshri Yojana
घोषणामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे
योजनेची सुरुवात७ मार्च, २०२४ पासून
उद्देशमहाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे.
बजेट रक्कम४८० करोड रुपये
लाभ३ हजार रुपये आर्थिक मदत, उपकरणे खरेदी साठी.
लाभार्थीराज्यातील ज्येष्ठ नागरिक
वयाची अट अर्जदाराचे वय हे ६५ वर्षा पेक्षा जास्त असावे.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ@alimco.in

Mukhyamantri Vayoshri Yojana Benifits (लाभ, फायदे)

Mukhyamantri Vayoshri Yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना फायदा हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे, या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदती बरोबरच इतर बरेच लाभ मिळणार आहेत.

 • मुख्यमंत्री वयोश्री योजना द्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये DBT द्वारे थेट बँक खात्यात मिळणार आहेत.
 • योजनेद्वारे ३००० रुपये, वर्षाला मदत स्वरूपात शासन पैसे देणार आहे.

आर्थिक मदत ही वृध्द लोकांसाठी वेगवेगळे उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाणार आहे, जर ज्येष्ठ व्यक्ती अपंग असेल किंवा वयोमान अशक्त असेल तर या उपकरणांचा त्यांना मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत मिळणारे उपकरणे

योजने द्वारे दिली जाणारी ३ हजार रुपयांची आर्थिक मदत हि वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी असणार आहे, पैसे DBT द्वारे थेट लाभार्थी जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आणि उपकरणासाठी जेवढा खर्च येणार तो पूर्णपणे राज्य सरकार भरणार आहे.

 • श्रवणयंत्र
 • फोल्डिंग वॉकर
 • बॅक सपोर्ट बेल्ट
 • व्हील चेयर
 • सर्वाइकल कॉलर
 • चष्मा
 • ट्रायपॉड
 • स्टिक व्हीलचेयर
 • कमोड खुर्ची
 • नि-ब्रेस लंबर बेल्ट

Mukhyamantri Vayoshri Yojana Elegibility Criteria (पात्रता निकष)

महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार जे व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभागी होता येणार आहे.

 • ज्येष्ठ नागरिकाचे वय हे किमान ६५ वर्षे असावे.
 • ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे २ लाखा पेक्षा कमी असावे.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.

जे अर्जदार वरील पात्रता निकषांची पूर्तता करतील, के त्यांनाच मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये सहभागी होता येईल. 

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra Document List (कागदपत्रे)

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

 1. अर्जदाराचे आधार कार्ड
 2. मतदान कार्ड
 3. रहिवासी प्रमाणपत्र 
 4. ओळखपत्र
 5. वयाचा पुरावा
 6. रेशनकार्ड
 7. अपंग असल्यास प्रमाणपत्र
 8. राष्ट्रीयकृत बँकेची खाते पासबुक प्रत
 9. स्वयं-घोषणा पत्र
 10. मोबाईल नंबर
 11. पासपोर्ट फोटो

वर दिलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करताना सादर करायचे आहेत. कागदपत्रे Soft Copy आणि Hard Copy दोन्ही स्वरूपात असावेत. या कागदपत्रांसोबत शासनाने ओळख निश्चित करण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे देखील लागणार आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना निधी वितरण (अर्थसहाय्य)

मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे वर सांगितल्याप्रमाणे आर्थिक मदत हि केली जाणार आहे. सोबतच पैसे हे थेट बँकेत जमा केले जाणार आहेत.

 • थेट वितरण (DBT) प्रणाली द्वारे रु. ३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण.
 • राज्य शासनाद्वारे वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी १००% पर्यंत अर्थसहाय्य.

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online 

Mukhyamantri Vayoshri Yojana Starting

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र ही योजना शिंदे सरकार मार्फत राज्यात सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना प्रमाणे या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना लाभ वेगवेगळे लाभ मिळणार आहेत. 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे, त्याची प्रक्रिया सुरु आहे. केंद्राच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर हि योजना राज्य सरकार राबवत आहे, त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया हि सारखीच असणार आहे.

योजने संबंधी मंत्री मंडळ निर्णय घेण्यात आला आहे, परंतु अद्याप याची अर्ज प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही. नवीन अपडेट येण्या आगोदर आम्ही तुम्हाला येथे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती दिली आहे. 

Maharashtra Mukhyamantri Vayoshri Yojana साठी पण अर्ज प्रक्रिया हि सारखीच असणार आहे, त्यामुळे तुम्ही पण या स्टेप वापरून योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

 • सर्वप्रथम तुम्हाला वयोश्री योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
 • वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online साठी रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करायचे आहे.
 • काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे, सर्व माहिती अचूक टाकायची आहे. माहिती चुकीची आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
 • सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे Soft Copy मध्ये अपलोड करायचे आहेत, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व त्यांची लिस्ट वर दिली आहे.
 • शेवटी वयोश्री योजनेचा फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. 

अशा रीतीने तुम्ही Maharashtra Mukhyamantri Vayoshri Yojana साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकता.

मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राबवण्यासाठी मान्यता मिळाली आहे, निधीची पण तरतूद करण्यात आली आहे. काही दिवसात योजनेचा GR शासन निर्णय प्रसिद्ध होणार आहे, तेव्हा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती लेखामध्ये अपडेट करण्यात येईल. 

त्यामुळे नवीन अपडेट मिळवण्यासाठी या लेखाला Bookmark करून ठेवा, आणि आमच्या WhatsApp Group ला पण जॉईन करा.

Mukhyamantri Vayoshri Yojana FAQ

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

मुख्यमंत्री वयोश्री योजना द्वारे जेष्ठ नागरिकांना उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra द्वारे किती रुपयांची आर्थिक मदत मिळणार?

महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे प्रत्येकी ३००० रुपये आर्थिक मदत मिळणार आहे, ज्या द्वारे जेष्ठ व्यक्ती मोफत उपकरणे घेऊ शकतात.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

Mukhyamantri Vayoshri Yojana चा लाभ हा ६५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मिळणार आहे.

16 thoughts on “मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024, ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, जाणून घ्या संपूर्ण माहिती |Mukhyamantri Vayoshri Yojana”

 1. वयोश्री योजना उपकरण खरेदीसाठी आहे एक वेळ उपकरण खरेदी झाल्यावर पुन्हा लाभ मिळणार का ? खर तर नियमित औषधोपचार, आहार यासाठी पण याचा समावेश गरजेचा आहे.

  Reply
 2. रु ३०००/-मध्ये कमोड बसविणे कसे जमेल, कमोड शिटची कमीत कमी किंमत रु ५ ते ६०००/- आहे व मजुरी व बाकी सामानाची किंमत ४ ते ५०००/-आहे.त्यामुळे ३०००/-₹ काहीच होणार नाही.

  Reply
 3. माझ्या आईचे वय ६७ आहे तिचा फॉर्म भरायचा आहे. कृपया ऑनलाईन रजिस्टर्ड\कसे करायचे. लिंक कोणती आहे

  Reply
 4. वस्तूच खरेदी करावी हे बंधनकारक आहे का?

  Reply
 5. माझ्या आईचे वय 69 आहे तिचा फॉर्म भरायचा आहे. कृपया ऑनलाईन रजिस्टर्ड\कसे करायचे. लिंक कोणती आहे

  Reply

Leave a Comment