Join Whatsapp Group

Join Telegram Group

मराठा SEBC कास्ट सर्टिफिकेट कसे काढावे? जाणून घ्या माहिती | Maratha SEBC Caste Certificate

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Maratha SEBC Caste Certificate Online कसे काढायचे? याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

राज्य सरकारने मराठा समाजासाठी 10% SEBC कोट्याचे आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि नोकरी मध्ये 10 टक्के एवढे आरक्षण मंजूर झाले आहे.

त्यानुसार या नव्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे, यामध्ये मराठा समाजातील तरुणांना आरक्षण असणार आहे. पण SEBC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तरुणांकडे SEBC Certificate असणे आवश्यक आहे.

ज्यांच्या कडे Maratha SEBC Caste Certificate आहे, केवळ त्याच मराठा तरुणांना फायदा होणार आहे. जर तुमच्या कडे अजून हे कास्ट सर्टिफिकेट नसेल, किंवा तुम्ही अद्याप काढले नसेल. तर या लेखामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही ऑनलाईन पण SEBC Caste Certificate काढू शकता.

Maratha SEBC Caste Certificate 

मराठा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन प्रकारे अर्ज करता येतो. ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर केला तर SEBC Caste Certificate येण्यासाठी अर्ज केल्यापासून 45 दिवस लागतात.

पण तुम्हाला जर Urgently कास्ट सर्टिफिकेट हवे असेल, तर तुम्ही तुमच्या जवळील तलाठी तहसील कार्यालयात जाऊन Maratha SEBC Caste Certificate साठी ऑफलाईन अर्ज पण करू शकता. ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला लवकर कास्ट सर्टिफिकेट दिले जाते, Urgently सर्टिफिकेट मिळवायचे असेल, तर तुम्ही तशी Request पण करू शकता. यामधे फक्त 15 दिवसांच्या आत SEBC प्रमाणपत्र दिले जाते.

Maratha SEBC Cast Certificate Document List In Marathi 

मराठा SEBC कास्ट सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे:

 • आधार कार्ड
 • रेशनकार्ड
 • TC शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
 • आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
 • बोनाफाईड प्रमाणपत्र
 • पालकांचे प्रमाणपत्र
 • नातेवाईकांचे जात नमूद असलेला पुरावा
 • स्वयं घोषणापत्र 
 • पालकांचा फोटो
 • गाव नमुना नंबर 14
 • कुटुंबात कोणाला सरकारी नोकरी असल्यास जात नोंदीचा साक्षांकित उतारा

यासोबत इतर काही कागदपत्रे देखील लागू शकतात, त्यामुळे वर दिलेली सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेतच, त्याबरोबर इतर काही आवश्यक कागदपत्रे पण सोबत राहू द्या. 

तुम्ही मराठा SEBC कास्ट सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत? याची माहिती पण तहसील कार्यालयातून किंवा सेतू केंद्रावरून मिळवू शकता. एकदा चौकशी नक्की करा. 

Maratha SEBC Caste Certificate Online Apply

मराठा कास्ट सर्टिफिकेट साठी ऑनलाइन स्वरूपात देखील अर्ज सादर करता येतो, त्यासाठी तुम्ही आपले सरकार या वेबसाईटवरून, महा ई-सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावरून देखील सर्टिफिकेट साठी online apply करू शकता.

या ठिकाणी आपण आपले सरकार या वेबसाईटवरून मराठा SEBC कास्ट सर्टिफिकेट कसे काढायचे? याची माहिती पाहणार आहोत.

 1. सुरुवातीला तुम्हाला आपले सरकार पोर्टल वर जायचे आहे, तेथे गेल्यावर तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी जिल्हा निवडून इतर माहिती भरायची आहे, शेवटी Username बनवून Login करायचे आहे.
 2. त्यानंतर आपले सरकार पोर्टल मध्ये लॉगिन करा, तेथे तुम्हाला Services मध्ये Revenue Department या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
 3. Revenue Department मध्ये Cast Certificate हा Option निवडायचा आहे. त्यानंतर तेथे येणाऱ्या पर्यायातून SEBC Cast Certificate हा पर्याय निवडायचा आहे.
 4. Option वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म येईल, तो फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. कोणतीही चूक या दरम्यान होऊ द्यायची नाही, केवळ जी माहिती विचारली आहे, तीच द्यायची आहे.
 5. त्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत, SEBC सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे वर दिली आहेत, त्यानुसार सर्व डॉक्युमेंट अपलोड करा.
 6. कागदपत्रे अपलोड झाल्यावर SEBC Caste Certificate Form एकदा तपासून पहा, एखादी Spelling mistake वगैरे, किंवा एखादी माहिती चुकून राहून गेली असेल, तर ती भरून घ्या.
 7. त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता, ऑनलाईन स्वरूपात कास्ट सर्टिफिकेट साठी अर्ज केल्यावर वर सांगितल्याप्रमाणे 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर तुमचा अर्ज Approved झाला की मग तुम्ही Cast Certificate Status पाहू शकता. 
 8. जर तुमचा फॉर्म मान्य झाला असेल, तर त्यांनतर तुम्ही Maratha SEBC Caste Certificate PDF स्वरूपात Download देखील करू शकता. 
महत्वाची सूचना: अद्याप मराठा आरक्षणा साठी SEBC कायदा संमत झाला नाहीये, त्यासाठी अधिकृत स्वरूपात कोणताही GR शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाहीये, त्यामुळे अजून ऑनलाईन पोर्टल वर Maratha SEBC Caste Certificate साठी Option आलेले नाहीत. त्यामुळे ज्यावेळी अधिकृत अपडेट येईल, तेव्हाच तुम्ही SEBC प्रमाणपत्र काढू शकता.

Maratha SEBC Caste Certificate FAQ

जुने Maratha SEBC प्रमाणपत्र चालेल का?

नाही, तुम्हाला नवीन SEBC प्रमाणपत्र काढावे लागेल, कारण पूर्वी 16% SEBC आरक्षण होते, पण आता 10% देण्यात आले आहे, त्यामुळे पूर्वीचे SEBC दाखले मान्य करण्यात येणार नाहीत.

How can I get SEBC certificate in Maharashtra?

तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करून SEBC जातीचे कास्ट सर्टिफिकेट मिळवू शकता.

SEBC Caste Certificate किती दिवसात निघते?

ऑनलाईन अर्ज केल्यावर 45 दिवस लागतात, तर ऑफलाईन साठी केवळ 15 दिवस लागतात. एवढ्या कालावधीत तुमचे मराठा SEBC प्रमाणपत्र निघते.

मराठा जातीचा दाखला कोठून काढावा?

मराठा जातीचा दाखला SEBC Certificate तुम्ही आपले सरकार पोर्टल वरून, ई-सेवा केंद्र किंवा सेतू वरून काढू शकता, सोबतच तहसील कार्यालयातून देखील दाखला मिळतो.

Leave a Comment