Join Whatsapp Group

Join Telegram Group

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आता पर्यंत काय केले? सवलती, शिष्यवृत्ती, सुविधा

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तब्बल कैक वर्षा पासून, शासन दरबारी धूळ खात पडला आहे. कधी आरक्षण मंजूर होत! आणि लगेच ते रद्द; पण तरीही मराठा समाज शांत होता, पण जेव्हा पासून जालना मध्ये पोलिसांनी लाठी चार्ज केला, तेव्हा पासून राज्यातील सर्व मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा आणि मागणी मराठा समाजाची आहे असे सांगण्यात आले.

मराठा आरक्षण संघर्ष हा बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे, पण अजून पर्यंत राज्य सरकारने या वर ठोस पावले उचलली नाहीत. या मुख्य कारणामुळेच आता राज्यात मराठा समाज हा संतप्त आहे. पण आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत, आरक्षण व्यतिरिक्त राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आता पर्यंत काय केले आहे? कोणत्या सवलती, शिष्यवृत्ती, सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

Maratha Reservation in Maharashtra 2023

मित्रांनो काल बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातच माहिती दिली, आता पर्यंत सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी काय केले हे सांगितले. कोण कोणत्या सुविधा, सवलती तसेच शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिल्या, कोणत्या योजना राबवल्या जात आहेत. असे सर्व काही यावेळी त्यांनी सांगितले, त्याच आधारे आपण आता पाहूया; मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आता पर्यंत काय केले?

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती, सुविधा दिल्या गेल्या आहेत. ‘सारथी’ संस्थेमार्फत उच्च शिक्षणासाठी फेलोशीप, स्कॉलरशिप, एमपीएससी (MPSC) व युपीएससी (UPSC) व इतर स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. आतापर्यंत सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांना 44.58 कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Maratha Reservation Maharashtra

आता मराठा समाज ज्या आरक्षणाची मागणी करतोय, त्या संदर्भात लवकरच ठोस निर्णय देखील घेतला जाणार आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले जाईल, अशी ग्वाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटत! तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment