Join Whatsapp Group

Join Telegram Group

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना 2024 मिळत आहेत भरपूर फायदे, जाणून घ्या लगेच

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणकोणत्या आहेत, यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

फक्त महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी काही योजना तर एवढ्या अभिनव आणि फायद्याच्या आहेत, ज्यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येणे सहज शक्य आहे.

महिलांची उन्नती व्हावी, त्यांनी देखील मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासन वेगवेगळ्या योजना वेळोवेळी राबवते. यामधे उदाहरण सांगायचे झाले तर, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर कर्ज योजना आहेत.

भरतकाम, विणकाम आणि शिवणकाम असे वेगवेगळे काम व्यवसायात रुपांतरीत देखील करण्याची सुविधा शासनाच्या विविध योजनाद्वारे दिली जात आहे.

महिला स्वावलंबी व्हाव्यात, सक्षम बनाव्यात आणि पुरुषांच्या बरोबरीने त्यांना पण समान संधी मिळाव्यात म्हणून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना (mahilansathi yojana) सुरू करण्यात आल्या आहेत.

शासनाने फक्त महिलांसाठी योजना कोण कोणत्या राबवल्या आहेत, त्यांचा नेमका महिलांना काय आणि कसा फायदा मिळणार याची माहिती आता आपण पुढे घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर महिला असाल, किंवा तुम्ही जरी पुरुष असाल तर तुमच्या आईला, बहिणीला किंवा तुमच्या पत्नीला पण या योजनांची माहिती नक्की द्या, म्हणजे त्यांना पण योजनांचा फायदा मिळेल.

Table of Contents

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत, ज्यामुळे महिलांना आर्थिक मदत करण्यापासून ते व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यापर्यंत एवढे सगळे फायदे मिळतात.

पण महिलांना शासनाच्या या योजनांची माहिती नसते, त्यामुळे माहिती अभावी मोठ्या प्रमाणात महिला या योजनांचा फायदा घेऊ शकत नाहीत, परिणामी महिला योजनांपासून वंचित राहतात.

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची लिस्ट खालील प्रमाणे आहे:

महिला स्वयंरोजगार योजना

महिला स्वयंरोजगार योजने अंतर्गत ज्या महिलांचे वय 18 ते 45 आहे, अशा महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय Business सुरू करण्यासाठी सुरुवातीला अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.

मागासवर्गीय प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांना 5,000 ते 10,000 रुपये प्रोत्साहनपर राशी शासन या महिला स्वयंरोजगार योजने अंतर्गत दिली जाते.

ज्या महिला बचत गटाच्या सदस्य आहेत, त्यांना या योजने द्वारे सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुम्ही जर महिला बचत गटाच्या सदस्य असाल, तर महिला स्वयंरोजगार योजना चा नक्की फायदा घ्या, आणि 5 हजार ते 10 हजार रुपये मिळवा.

महिला उद्योगिनी योजना

या योजने अंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल 3 लाख रुपये एवढे कर्ज दिले जाते. ज्याद्वारे महिला लघु व्यवसाय, किरकोळ किंवा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात.

कर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिला जर अनुसूचित जाती किंवा जमाती मधील असतील, अथवा विकलांग असतील तर त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 3 लाखाच्या कर्जावर 1 रूपया पण व्याज घेतले जात नाही, जेवढी मुद्दल रक्कम आहे तेवढीच फक्त द्यायची आहे.

बाकी इतर प्रवर्गातील महिला असतील, तर त्यांना अगदी नाममात्र व्याजदरावर हे कर्ज दिले जाते. काही प्रमाणात व्याज आकारले जाते, पण इतर कर्जपेक्षा या योजनेतून मिळालेले कर्ज हे कमी व्याजदरात दिले जाते.

महिला सन्मान बचत पत्र योजना

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या महिला सन्मान बचत पत्र योजना द्वारे महिलांना गुंतवणूक करण्यासाठी मोठी अभिनव अशी Investment Scheme सुरू करण्यात आली आहे.

गुंतवणुकीवर तब्बल 7.5% एवढं चक्रवाढ व्याज दिलं जाणार आहे, गुंतवणुकीची रक्कम मर्यादा ही 2,00,000 रुपये एवढी ठरवण्यात आली आहे.

बँकेपेक्षा या योजनेत मिळणारे व्याज दर हे सर्वाधिक आहे, यामुळे महिलांना त्यांचा कष्टाचा पैसा एका चांगल्या जागी गुंतवणूक करता येणार आहे. याद्वारे मोठे Return देखील मिळणार, म्हणजे बघा योजना ही सध्या तरी फक्त 2 वर्षासाठी गुंतवणुकीची मुभा देते, म्हणजे तुम्हाला 2 लाख रुपयांवर 7.5% या प्रमाणे 2 वर्षानंतर मोठी रक्कम मिळणार आहे.

जननी सुरक्षा योजना

गरोदर महिलांसाठी राबवली जाणार ही एक मोठी अभिनव अशी योजना आहे, या योजने द्वारे प्रसूतीच्या वेळी महिलांना शासनाद्वारे 1400 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

महिलांचे जर सिजर झाले असेल, तर त्यांना 1500 रुपये एवढी मदत केली जाणार आहे. तसेच दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर होम डिलिव्हरी झाल्यावर 7 दिवसांच्या आत दिली जाते.

या योजनेत महिलांची मदत करणाऱ्या आशा सेविकांना 600 रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाते, आणि त्यांच्या वाहतुकीसाठी पण 250 रुपये जास्तीचे दिले जातात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे, आता ही योजना महाराष्ट्रात देखील राज्य सरकारने लागू केली आहे. त्यामुळे महिलांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.

या योजनेद्वारे एकूण 6,000 रुपये रक्कम 3 हप्त्याच्या स्वरूपात महिलांना दिली जाते, ज्या महिलांची प्रसूती झाली आहे त्याच स्तनदा महिला या मातृ वंदना योजना साठी पात्र असणार आहेत.

जरी महिला गरोदर असेल किंवा महिलेची प्रसूती झाली असेल, तरी पण या मातृ वंदना योजनाचा लाभ सर्व पात्र अशा महिलांना दिला जातो.

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना द्वारे ज्या पालकांना मुलगी झाली आहे, त्यांना त्यांच्या मुलीच्या भरणपोषण आणि शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

तब्बल 1,01,000 रुपये एवढी मोठी आर्थिक सहायता मिळणार आहे, सोबत जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल तेव्हा तिला एकरक्कमी 75,000 रुपये पण दिले जाणार आहेत. एकूण पाच हप्त्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत, त्यामुळे मुलींना मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

या विधवा पेन्शन योजना द्वारे महिलांना राज्य शासनाद्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे. ज्यामुळे विधवा महिलांना आपले भरणपोषण करण्यासाठी मदत होणार आहे.

विधवा महिलांसाठी प्रत्येक महिन्याला राज्य शासन त्यांच्या बँक खात्यावर 600 रुपये टाकणार आहे, म्हणजे वर्षाला महिलांना प्रत्येक वर्षी 7,200 रुपये मिळणार आहेत.

जर विधवा महिलेला मुले असतील तर मिळणारी पेन्शन वाढवली जाणार आहे, आणि प्रत्येक महिन्याला 600 रुपये ऐवजी 300 रुपये वाढवून 900 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे वर्षाला 10,800 रुपये एवढी आर्थिक मदत मिळणार आहे.

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना FAQ

महाराष्ट्रात महिलांसाठी सरकारी योजना काय आहे?

महाराष्ट्रात महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात, त्याची सविस्तर माहिती आपण वर लेखामध्ये दिली आहे.

महाराष्ट्रातील मुलींसाठी कोणती नवीन योजना आहे?

राज्य सरकारने मुलींसाठी नवीन सुरू केलेली योजना म्हणजे लेक लाडकी योजना होय, या योजनेची माहिती वर लेखामध्ये दिली आहे, फायदा घ्यायचा असेल तर आर्टिकल नक्की वाचा.

महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या योजनेद्वारे कर्ज मिळते?

महिला उद्योगिनी योजना द्वारे महाराष्ट्रातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल 3 लाख रुपये एवढे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Leave a Comment