Join Whatsapp Group

Join Telegram Group

महाराष्ट्र शिक्षक भरती, २१ हजार ६७८ जागा! थेट नोकरी, अर्ज करा | Maharashtra Shikshak Bharti 2024

मित्रांनो राज्य सरकारने शिक्षक भरती साठी अखेर जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तब्बल २१,६७८ एवढ्या रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

महाराष्ट्र शिक्षक भरती ही १ ली ते १२ वी वर्गासाठी होणार आहे, त्यासाठी Qualification Criteria शासनाने सांगितला आहे, त्यानुसार जे उमेदवार पात्र असतील त्यांनाच भरती साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

शिक्षक भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा? पात्रता निकष काय आहेत? अर्जाची शेवटची तारीख कोणती? अशी सगळी माहिती मी या लेखामध्ये दिली आहे. 

कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला Maharashtra Shikshak Bharti 2024 साठी Online Form भरता येईल.

Shikshak Bharti 2024 Maharashtra

📢 भरतीचे नाव – Shikshak Bharti 2024

✅ पदाचे नाव – शिक्षक (Teacher)

🚩 एकूण रिक्त जागा – २१,६७८ 

इयत्तापद संख्या
पहिली ते पाचवी१०,२४०
सहावी ते आठवी८,१२७
नववी ते दहावी२,१७६
अकरावी ते बारावी१,१३५
एकूण जागा२१,६७८

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता 

  • इयत्ता १ ली ते ८ वी:  (i) D.Ed / B.Ed  (ii) TAIT  (iii) TET
  • इयत्ता ९ वी ते १२ वी: (i) D.Ed / B.Ed  (ii) TAIT

शिक्षक भरती साठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदा नुसार भिन्न आहे. ज्या वर्गासाठी किंवा माध्यमासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्यानुसार तुमचे शिक्षण झालेले असावे.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

💰 पगार – ₹३५,०००/- (वेतन श्रेणी भिन्न असू शकते)

💵 परीक्षा फी – कोणतीही फी नाही.

📝 अर्ज करण्याची पद्धत – Apply Online

🔞 वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे

📍 वयोमर्यादा सूट – मागासवर्ग ५ वर्षांची सूट

📆 फॉर्मची Last Date – अपडेट होईल

📄 जाहिरात PDFDownload करा
🖥️ ऑनलाईन फॉर्मयेथून भरा

Shikshak Bharti 2024 Qualification 

महाराष्ट्र शिक्षक भरती साठी राज्य सरकारने काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार अर्जदार उमेदवाराला या भरती साठी अर्ज सादर करायचा आहे.

जे उमेदवार Qualification Criteria पूर्ण करतील त्यांनाच या भरती साठी पात्र ठरवले जाईल, इतर उमेदवार शिक्षक भरती साठी अर्ज करू शकणार नाहीत.

Shikshak Bharti 2024 Elegibility Criteria पुढीलप्रमाणे:

  • उमेदवाराने TAIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • TAIT परीक्षा २०२२ किंवा २०२३ मधील ग्राह्य धरली जाणार आहे.
  • प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी उमेदवाराचे वय हे १८ ते ३७ वर्षे असावे. (१ली ते ८वी)
  • माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी उमेदवाराचे वय हे २१ ते ४० वर्षे असावे. (९वी ते १२वी)

वर सांगितलेले सर्व निकष जे उमेदवार पूर्ण करतील, केवळ त्यांनाच शिक्षक भरती २०२४ साठी पात्र ठरवण्यात येणार आहे. 

Shikshak Bharti 2024 PDF (जाहिरात अधिसूचना)

shikshak bharti news

महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत जाहिरात PDF प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोर्टाने शिक्षक भरती साठी हिरवा कंदील दिला आहे, त्यामुळे राज्य सरकारने शिक्षक भरती २०२४ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

सरकारने महाराष्ट्र शिक्षक मेगा भरती साठी घोषणा केली आहे, तसेच पसंती क्रम नोंदवण्याची प्रक्रिया पण सुरू झाली आहे. त्याची Last Date १२ फेब्रुवारी २०२४ आहे, मुदतवाढ मिळाली आहे, त्यामुळे लवकर आपला पसंती क्रम नोंदवून घ्या.

Shikshak Bharti 2024 Notification PDF उपलब्ध झाली आहे, अधिकृत रीत्या PDF प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याची Download Link खाली देण्यात आली आहे, निळ्या लिंक वर क्लिक करून PDF Download करा.

How to Apply for Maharashtra Shikshak Bharti 2024 (अर्ज प्रक्रिया)

शिक्षक भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी Official Website जारी केली आहे.

वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा शिक्षक भरती २०२४ साठीचा अर्ज सादर करू शकता.

पण ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी तुम्हाला आगोदर आपली पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे.

वर दिलेल्या Qualification Criteria मध्ये तुम्ही जर येत असाल, तरच अर्ज करा! अन्यथा फॉर्म भरू नका, तुमचा अर्ज Reject करण्यात येईल.

सोबतच अर्ज करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे, कोणतीही चूक होऊ द्यायची नाही. अचूक फॉर्म अपेक्षित आहे, चूक झाल्यास अर्ज बाद पण केला जाऊ शकतो.

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची Last Date अद्याप जाहीर करण्यात आली नाही, ज्यावेळी अंतिम तारीख येईल तेव्हा त्याची अपडेट आम्ही देऊ.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात PDF वाचून घ्या! म्हणजे अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

1 thought on “महाराष्ट्र शिक्षक भरती, २१ हजार ६७८ जागा! थेट नोकरी, अर्ज करा | Maharashtra Shikshak Bharti 2024”

Leave a Comment