Join Whatsapp Group

Join Telegram Group

10 वी पास वर पोस्टात बंपर भरती! 29,480 रु. महिना पगार – Maharashtra Post Office Bharti 2023

Maharashtra Post Office Bharti 2023: मित्रांनो पोस्ट ऑफिस द्वारे ग्रामीण डाक सेवक पदासाठी मोठी भरती निघाली आहे. Indian Post विभागाद्वारे यासंबंधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात ही ऑल इंडिया साठी जाहीर केली असून महाराष्ट्र सर्कल साठी देखील यामध्ये रिक्त जागा देण्यात आले आहेत.

Maharashtra Post Office Bharti 2023

ग्रामीण डाक सेवक पदांसाठी महाराष्ट्रामध्ये पोस्ट ऑफिस विभागाद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली असून एकूण रिक्त जागा या 3154 आहेत. या फक्त महाराष्ट्र सर्कल साठी लागू असणार आहेत, एकूण पूर्ण भारतामध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी रिक्त जागा या 30041 आहेत.

पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र संबंधी सविस्तर अशी माहिती आज आपण या लेखामध्ये घेणार आहोत. तुम्ही जर दहावी पास असाल आणि तुम्ही एमएस-सीआयटी किंवा इतर संगणक कोर्स केलेले असतील तर तुमच्यासाठी ही एक पर्वणी आहे. पोस्टात लागलीच डाक सेवक पदासाठी तुमचा फॉर्म भरून टाका.

फॉर्म कसा भरायचा याची माहिती आम्ही या लेखामध्ये दिली आहे. सोबतच इतर महत्त्वाच्या बाबी देखील सांगितले आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आहे तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा आणि अशाच नोकर भरती अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

Maharashtra Post Office Bharti 2023 information in Marathi संपूर्ण माहिती

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (GDS)

पदसंख्या – एकूण 3154 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

पगार – ₹12,000 ते ₹29,480/-

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास, MSCIT कोर्स

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

Form फी – इतर प्रवर्ग: ₹100, राखीव प्रवर्ग: ₹0

ऑनलाईन फॉर्म भरण्याची Last Date – 23 ऑगस्ट, 2023

फॉर्म Edit करण्याची तारीख – 24 ते 26 ऑगस्ट, 2023

अधिकृत वेबसाईटभेट द्या
ऑनलाईन अर्जApply Now
जाहिरात PDFDownload

How to Apply For Post Office Bharti 2023 Maharashtra ऑनलाईन अर्ज कसा करावा?

ज्या उमेदवारांना पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी अर्ज करायचा आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

सर्वप्रथम लेखामध्ये दिलेल्या Apply Now या Link क्लिक करा, तुम्ही पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल.

तेथे तुम्हाला डाव्या बाजूला असलेल्या Apply Online या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल.

समोर आलेला फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे कोणतीही माहिती चुकीची टाकायची नाहीये. फॉर्म चुकल्यानंतर Edit करण्यासाठी तीन दिवसाचा अवधी देण्यात आला आहे.

फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे. सोबतच तुम्हाला दहावीला किती टक्केवारी पडली याचा तपशील देखील फॉर्ममध्ये भरायचा आहे.

त्यानंतर जर तुम्ही इतर गटामध्ये येत असाल तर तुम्हाला शंभर रुपये फॉर्म फी भरावी लागेल. आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला फॉर्म साठी कोणत्याही स्वरूपाची फी भरण्याची गरज नाही.

राखीव प्रवर्गात SC, ST, PWD आणि महिला आहेत. यांना पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी फॉर्म फी भरण्याची गरज नाही.

त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला पूर्ण फॉर्म चेक करून कुठे चूक झाली असेल तर ती दुरुस्त करायचे आहे.

फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म पोस्ट ऑफिस कडे पाठवला जाईल. त्यानंतर पोस्टाचा निकाल जाहीर झाल्यावर मेरिट लिस्ट द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
ऑनलाईन अर्जApply Now
जाहिरात PDFDownload

पोस्ट ऑफिस भरती 2023 FAQ

पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र सर्कल साठी एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण रिक्त जागा 3154 आहेत.

पोस्ट ऑफिस भरती 2023 ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे?

ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 23 ऑगस्ट, 2023 आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार हा दहावी पास असावा, आणि उमेदवाराने कोणताही संगणक कोर्स केलेला असावा.

Leave a Comment