Join Whatsapp Group

Join Telegram Group

महाराष्ट्र पोलीस भरती मार्च 2024 – फॉर्म, शेवटची तारीख, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Maharashtra Police Bharti)

नमस्कार मित्रांनो, Maharashtra Police Bharti 2024 साठी अखेर आता ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.

तब्बल 16 हजार पेक्षा जास्त रिक्त जागा पोलीस खात्यात भरल्या जाणार आहेत, विशेष बाब म्हणजे ही महाराष्ट्र पोलीस भरती 10 वी 12 वी पास वर होणार आहे.

म्हणजे तुम्ही जर 10 वी किंवा 12 वी पास असाल, तर तुम्हाला पण पोलीस होता येणार आहे. पोलीस शिपाई, वाहन चालक, कारागृह शिपाई आणि पोलीस बॅन्डस्मन या सर्व पदांसाठी हि भरती राबवली जात आहे.

जिल्हानिहाय जागा निघाल्या आहेत, त्यानुसार जिल्हास्तरावर ही पोलीस भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, फॉर्म 5 मार्च पासून सुरू झाले आहेत. 

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी केवळ 26 दिवस दिले गेले आहेत, ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ही 31 मार्च, 2024 आहे. मुदत वाढ मिळेल या आशेवर राहू नका, त्वरित आपला पोलीस भरतीचा फॉर्म भरून टाका.

Maharashtra Police Bharti 2024

📢 भरतीचे नाव – महाराष्ट्र पोलीस भरती 2024

✅ पदाचे नाव – शिपाई, बॅन्डस्मन, चालक

🚩 एकूण रिक्त जागा – 16,190

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा 10 वी किंवा 12 वी पास असावा.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

💰 पगार – 29 ते 31 हजार रुपये

💵 परीक्षा फी – Open: 450 रूपये [मागासवर्ग: 350 रुपये]

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – वयाची अट ही 19 ते 28 वर्षे आहे.

📍 वयोमर्यादा सूट – OBC: 18 ते 33 वर्षे [अपंग: 18 ते 45 वर्षे]

📆 फॉर्मची Last Date – 31 मार्च, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळmahapolice.gov.in
🖥️ जाहिरात (अधिसूचना)PDF Download करा
📝 ऑनलाइन अर्जApply Online Form

Maharashtra Police Bharti Qualification Details (पात्रता निकष)

महाराष्ट्र पोलीस भरती साठी पात्रता निकष हे दोन प्रकारचे आहेत, शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता या दोन्ही निकषांची पूर्तता उमेदवारांना करणे आवश्यक आहे. सोबतच पात्रता निकषात वयाची अट देखील समाविष्ट आहे, Age Limit पदा नुसार आणि प्रवर्गानुसार भिन्न आहे.

महाराष्ट्र शिक्षक भरती, २१ हजार ६७८ जागा! थेट नोकरी, अर्ज करा

Maharashtra Police Bharti Education Qualification (शैक्षणिक पात्रता निकष)

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष सांगितले आहेत, त्यामुळे उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी सांगण्यात आलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12वी उत्तीर्ण
पोलीस वाहन चालक12वी उत्तीर्ण
पोलीस शिपाई-SRPF12वी उत्तीर्ण
कारागृह शिपाई 12वी उत्तीर्ण
पोलीस बॅन्डस्मन10वी उत्तीर्ण

पोलीस भरती मध्ये 12 वी पास वर 4 पदांसाठी भरती होणार आहे, तर 10 वी पास वर केवळ एकाच पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

Maharashtra Police Bharti Physical Qualification (शारीरिक पात्रता निकष)

पोलीस भरती साठी शारीरिक पात्रते मध्ये केवळ उंची आणि छाती पहिली जाणार आहे. पुरुष आणि महिलांसाठी ही शारिरीक पात्रता वेगवेगळी असणार आहे.

उंची/छातीपुरुषमहिला
उंचीकिमान 165 सेमीकिमान 155 सेमी
छातीन फुगवता 79 सेमी

Maharashtra Police Bharti Age Limit (वयोमर्यादा निकष)

पोलीस भरतीसाठी वयाची अट ही पदानुसार आणि प्रवर्गानुसार वेगवेगळे असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ही वयाची अट पालन करणे अनिवार्य असणार आहे.

पदानुसार वयाची अट

पोलीस शिपाई18 ते 28 वर्षे
पोलीस बॅन्डस्मन18 ते 28 वर्षे
कारागृह शिपाई18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-SRPF18 ते 25 वर्षे

प्रवर्गानुसार वयाची अट

खुला प्रवर्ग18 ते 28 वर्षे
OBC प्रवर्ग18 ते 33 वर्षे
अपंग उमेदवार18 ते 45 वर्षे

वयोमर्यादा निकष हे प्रवर्गानुसार वेगवेगळे जरी असले, तरी त्यांना पदानुसार वयाची अट लागू असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना Age Limit मध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर अपंग दिव्यांग उमेदवारांना तब्बल 17 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

Maharashtra Police Bharti Apply Online (ऑनलाईन अर्ज प्रक्रिया)

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत, त्यासाठी @mahapolice.gov.in द्वारे ही @policerecruitment2024.mahait.org अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे.

पोलीस भरती अर्ज करण्यासाठी सुरुवातीला अधिकृत पणे जारी केलेल्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईट वर गेल्यावर पोलीस भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, आवश्यक ती सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकायची आहे.

त्याचबरोबर पोलीस भरती साठी लागणारे कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, अर्जामध्ये दिलेल्या सुचने नुसार त्यांची Size असणे आवश्यक आहे.

Maharashtra Police Bharti साठी Exam Fees भरणे देखील गरजेचे आहे, जे उमेदवार फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शेवटी महाराष्ट्र पोलीस भरतीचा अर्ज भरून झाल्यावर फॉर्म सबमिट करा, त्या अगोदर एकदा अर्ज तपासून घ्या, एखादी चूक असेल तर ती दुरुस्त करा.

पोलीस भरती महाराष्ट्र साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च, 2024 आहे. देय तारखे नंतर सादर केलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे काळजी घ्यायची आहे, आणि वेळेत फॉर्म भरायचा आहे! 

पोलीस भरतीची तारीख वाढेल या भ्रमात राहू नका, फॉर्म भरून टाका. कारण भरतीची साईट जास्त ट्रॅफिक मुळे Down होते, तेव्हा तुम्हाला तुमचा अर्ज करता येणार नाही, म्हणून सुरुवातीलाच अर्ज भरून टाका.

Maharashtra Police Bharti FAQ

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

पोलीस भरती साठी एकूण रिक्त जागा या 16,190 आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?

पोलीस भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले गेले आहे. त्याची माहिती लेखामध्ये दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस भारती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

पोलीस भरती साठी 18 ते 28 अशी वयाची अट आहे, पण पदानुसार आणि प्रवर्गानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती लेखामध्ये दिली आहे.

Leave a Comment