Join Whatsapp Group

Join Telegram Group

महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 | Krushi Sevak Bharti 2023

krushi Sevak Bharti 2023 Maharashtra, syllabus, qualification, online form last date, nagpur, exam date, apply online, registration, kolhapur, eligibility criteria, application form date, Www Krishi Maharashtra gov in Recruitment, कृषी विभाग भरती 2023, कृषी सेवक भरती 2023, कृषी सेवक भरती 2023 महाराष्ट्र

Krushi Sevak Bharti 2023: नमस्कार मित्रांनो कृषी सेवक पदासाठी महाराष्ट्र कृषी विभागामार्फत बंपर भरती निघाली आहे. यासाठी शासनाद्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिराती च्या अंतर्गत कृषी सेवक पदाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कृषी सेवक पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे त्यांना लवकरात लवकर त्यांचा फॉर्म भरून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 साठी एकूण रिक्त जागा या 2109 आहेत. यातील एकूण आठ जिल्ह्यांमध्ये कृषी सेवक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजी नगर, लातूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

कृषी सेवक पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे, यासंबंधी लवकरच अधिकृत वेबसाईटवर फॉर्म स्वीकारणे चालू होणार आहे. या लेखामध्ये आपण कृषी सेवक भरती संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार,  शैक्षणिक पात्रता निकष काय आहेत? भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? अशा सर्व महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेणार आहोत.

Krushi Sevak Bharti 2023 Information in Marathi

पदाचे नाव कृषी सेवक (Krushi Sevak)
पदसंख्या 2109 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा फी इतर प्रवर्ग – ₹1000/- राखीव प्रवर्ग – ₹900
वयाची अट 19 ते 38 वर्षे
शैक्षणिक पात्रताशासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल
अधिकृत वेबसाईट भेट द्या
Online अर्ज Apply Online
जाहिरात PDF Download करा
अभ्यासक्रम Download करा

Krushi Sevak Bharti 2023 Vacency Details (पदाचे नाव आणि तपशील)

विभागरिक्त जागा
अमरावती227
छ. संभाजीनगर 196
कोल्हापूर250
लातूर 170
नागपूर 448
नाशिक 336
पुणे 188
ठाणे 294
एकूण2109 रिक्त जागा

Krushi Sevak Bharti 2023 Qualification (Elegibility Criteria) पात्रता निकष

कृषी सेवक पदासाठी या उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे, त्यांना पात्रता निकषांचे पालन करावे लागणार आहे. कृषी सेवक पात्रता निकषांमध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या प्रकारचे काही बाबी समाविष्ट आहेत. उमेदवाराला या सर्व पात्रता निकषांचे पालन करावे लागणार आहे, जर एखादा उमेदवार या कृषी सेवक भरती पात्रता निकषांमध्ये येत नसेल; तर त्या उमेदवाराचा अर्ज हा ग्राह्य धरण्यात येणार नाही. सोबतच त्या उमेदवाराला भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म देखील भरता येणार नाही.

कृषी सेवक भरती शैक्षणिक पात्रता निकष (Educational Qualification)

कृषी सेवक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निकष हे कृषी विभागाद्वारे अधिकृतपणे ठरवण्यात आले आहेत. उमेदवारांना या शैक्षणिक पात्रता निकषांचे पालन करावे लागणार आहे.

शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वर सांगितल्याप्रमाणे उमेदवार हा शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधून डिप्लोमा किंवा पदवी अथवा पदवी समतुल्य शिक्षण घेतलेला असावा.

कृषी सेवक भरती वयोमर्यादा (Age Limit)

शैक्षणिक पात्रतेनुसारच कृषी सेवक पदासाठी वयोमर्यादा निकष देखील कृषी विभागाद्वारे ठरविण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी हे वयोमर्यादा निकष लागू असणार आहेत. उमेदवार हा दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  वयाचा असावा, म्हणजेच या तारखे पर्यंत उमेदवाराचे वय हे 19 ते 38 वर्षा दरम्यान असावे. या वयोमर्यादा निकषांमध्ये मागासवर्गीय गटातील उमेवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. मागासवर्गीय उेदवारांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे, म्हणजेच त्यांचे वय हे 19 ते 43 वर्षे पर्यंत असावे लागणार आहे.

कृषी सेवक भरती अभ्यासक्रम (Syllabus)

कृषी सेवक पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांच्या साठी अधिकृत पने कृषी विभागाद्वारे अभ्यासक्रम (Krushi Sevak Bharti Syllabus) जारी केला आहे. या अभ्यासक्रमामध्ये कृषी सेवक भरती संबंधी पेपर कशा प्रकारे असणार आहे याची माहिती दिली आहे. सोबतच उमदेवरांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हा अभ्यासक्रम स्वतः कृषी विभागातर्फे Design करण्यात आलेला आहे.

कृषी सेवक भरती अभ्यासक्रम कसा आहे? Krushi Sevak Bharti Syllabus Pdf तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची Direct Link आम्ही दिलेली आहे. Download करा या लिंक वर क्लिक करून तुम्ही कृषी सेवक भरती 2023 अभ्यासक्रम PDF Download करू शकता. याची लिंक लेखामध्ये वर दिलेली आहे! 👆

Krushi Sevak Bharti 2023 Apply Online

कृषी सेवक भरती 2023 ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा?

कृषी सेवक भरतीसाठी ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांना खाली दिलेल्या सर्व Step काळजीपूर्वक वाचून घ्याव्या लागतील. म्हणजे कृषी सेवक भरती चा ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही.

  • सर्वात प्रथम तुम्हाला लेखामध्ये दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. त्याची Direct Link आम्ही लेखामध्ये दिली आहे, लेखामध्ये Online अर्ज च्या पुढील Apply Online या लिंक वर क्लिक करून तुम्ही वेबसाईट वर जाऊ शकता.
  • वेबसाईट वर पोहोचल्या वर तुम्हाला Krushi Sevak Bharti 2023 किंवा Apply Online असा पर्याय शोधायचा आहे, त्यानंतर त्यावर क्लिक करायचे आहे. पर्याय अद्याप आला नसेल तर तुम्ही काही दिवसांनी पुन्हा वेबसाईट चेक करून पाहू शकता.
  • आता तुमच्या समोर कृषी सेवक भरती चा फॉर्म उघडेल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक सूचनेनुसार भरायचा आहे.
  • आवश्यक असे सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत, त्यानंतर जेवढी परीक्षा फी सांगितली आहे तेवढी Fee भरायची आहे.
  • पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म चेक करायचा आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक असेल तर ती तुम्हाला लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे.
  • अशाप्रकारे फॉर्म भरून झाल्यावर सर्व अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज Submit करायचा आहे.

Krushi Sevak Bharti FAQ

कृषी सेवक भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

कृषी सेवक भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 2109 आहेत.

कृषी सेवक भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख जारी करण्यात आलेली नाही. तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

कृषी सेवक पदासाठी महिन्याला पगार किती आहे?

Krushi Sevak Salary ही ₹6000 प्रती महिना आहे.

कृषी सेवक भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

कृषी सेवक पदासाठी वयोमर्यादा ही 19 ते 38 वर्षे आहे.

कृषी सेवक भरतीसाठी परीक्षा फी किती आहे?

इतर प्रवर्ग – ₹1000/- राखीव प्रवर्ग – ₹900

Leave a Comment