Join Whatsapp Group

Join Telegram Group

आजपासून घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 400 रुपयांनी स्वस्त! कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान, पहा | LPG Cylinder Price Drop

LPG Cylinder Price Drop: रक्षाबंधनाच्या या सणानिमित्त मोदी सरकारने देशातील सर्व महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे. आज पासून आता LPG Gas Cylinder च्या किंमती सर्वात जास्त कमी होणार आहेत. म्हणजे आज पासूनच हा निर्णय लागू होणार आहे, केंद्रीय मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वसामान्यांना दिलासा मोदी सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने मंगळवारी घरगुती वापरासाठीच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमतीत 200 रुपयांनी कपात करून गृहिणींना एकप्रकारे रक्षाबंधनाची भेटच दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी 30 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. याशिवाय सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत 75 लाख नवीन सिलिंडर जोडणी मोफत देणार आहे.

मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार LPG गॅस सिलेंडर च्या किंमती या आजपासून 200 रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या आहेत. आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 400 रुपयांचे गॅस अनुदान मिळणार आहे. त्यांना आधीच 200 रुपये अनुदान मिळत आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना आता 783 रुपयांना सिलिंडर मिळेल.

दिनांक 30 ऑगस्ट, 2023 पासून नवीन गॅस सिलेंडर च्या किंमती या लागू होणार आहेत. साध्या जोडणी असलेल्या लाभार्थ्यांना 200 रूपयांचे अनुदान, तर उज्ज्वला योजना च्या लाभार्थ्यांना तब्बल 400 रूपयांचे अनुदान मिळणार आहे.

1 thought on “आजपासून घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 400 रुपयांनी स्वस्त! कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान, पहा | LPG Cylinder Price Drop”

Leave a Comment