Join Whatsapp Group

Join Telegram Group

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? Lek Ladki Yojana Form PDF Download

मित्रांनो महाराष्ट्र शासनाद्वारे Lek Ladki Yojana सुरू झाली आहे, अधिकृत GR प्रसिद्ध झाला आहे. तसेच नागरिकांना आता प्रश्न पडलाय की, लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? तर या संदर्भातच सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Lek Ladki Yojana Form PDF Download Link हि आर्टिकल च्या शेवटी दिली आहे, तुम्हाला फॉर्म Download करायचा असेल तर तुम्ही Table of Contents मध्ये दिलेल्या लेक लाडकी योजना फॉर्म PDF Section मध्ये जाऊन Direct फॉर्म मिळवू शकता.

या सोबत लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? याची माहिती पण आपण लेखामध्ये दिली आहे, ती माहिती पण वाचून घ्या, म्हणजे अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Lek Ladki Yojana 2024 Form

दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी लेक लाडकी योजना अधिकृत रीत्या सुरू करण्यासाठी शासनाने शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध केला आहे. 

लेक लाडकी योजने साठी अटी आणि शर्ती काय आहेत? कागदपत्रे कोणते लागणार आहेत? अर्ज कसा करायचा? अशी संपूर्ण माहिती आता आपण पाहूया.

लेक लाडकी योजना अटी आणि शर्ती (पात्रता निकष)

 • लेक लाडकी योजने साठी केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली पात्र असणार आहेत.
 • दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर केवळ मुलीलाच लाभ मिळणार आहे.
 • जर 1 एप्रिल 2023 आगोदर मुलगी जन्माला आली असेल, तरी देखील त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. (सुधारित) माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून, त्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
 • पहिल्या आपत्या च्या पहिल्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना, माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र इतर कागदपत्रांसोबत सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थी कुटुंब हे कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्यांचे बँक खाते हे महाराष्ट्रातील कोणत्याही बँकेत असावे, इतर राज्यातील बँक खाते गृहीत धरले जाणार नाही.
 • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये 1 लाख पेक्षा जास्त नसावे, आढळल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे

लेक लाडकी योजना 2024 साठी अर्ज सादर करताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. एकूण 10 कागदपत्रे आहेत, हे सर्व फॉर्म सोबत द्यायचे आहेत.

लेक लाडकी योजना कागदपत्रे:

 1. लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला 
 2. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे) सोबत तहसीलदाराचा दाखला आवश्यक आहे.
 3. लाभार्थी मुलीचे आधार कार्ड (केवळ पहिल्या हप्त्या वेळी सादर करणे आवश्यक) 
 4. मुलीच्या आई – वडिलाचे आधार कार्ड 
 5. बँक पासबुक झेरॉक्स (फक्त पहिल्या पानाची)
 6. रेशन कार्ड झेरॉक्स (केशरी किंवा पिवळे) [पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स]
 7. मतदान कार्ड ओळखपत्र (शेवटच्या हप्त्या वेळी जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल)
 8. शाळेचा बोनाफाईड (मुलगी ज्या वर्गात शिकत आहे त्या संबधित लाभ मिळवण्यासाठी)
 9. माता पित्यांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (केवळ दोन आपत्य असल्यास)
 10. मुलीचे अविवाहित प्रमाणपत्र (18व्या वर्षी अंतिम हप्ता 75 हजार मिळवण्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा) सोबत स्वयं घोषणापत्र

लेक लाडकी योजनेचे हप्ते कसे मिळणार?

👶मुलीचा जन्म झाल्यावर₹5,000/-
👧मुलगी इयत्ता पहिली मध्ये गेल्यावर₹6,000/-
🏫मुलगी सहावीत गेल्यावर₹7,000/-
👩‍🏫मुलगी अकरावीत गेल्यावर₹8,000/-
👩‍🎓मुलीचे वय 18 वर्षे झाल्यावर₹75,000/-
एकूण लाभ –₹1,01,000/-

Lek Ladki Yojana Maharashtra Online Form 2024

Lek Ladki Yojana Maharashtra Online Form 2023

लेक लाडकी योजनेसाठी फॉर्म सुरू झाले आहेत, वरील अटी आणि शर्ती लागू असणारे लाभार्थी योजने साठी अर्ज करू शकणार आहेत.

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? संपूर्ण अर्ज प्रक्रिया:

 • अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, परंतु लाभार्थ्यांना स्वतः हून फॉर्म भरण्याची गरज नाही. यासाठी शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
 • लेक लाडकी योजने साठी अर्ज हा अंगणवाडी सेविका मार्फत भरला जाणार आहे. मुलीचे आई – वडील आपल्या गावातील किंवा जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकणार आहेत.
 • अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका यांच्याद्वारे अर्ज सादर करायचा आहे. लाभार्थ्यांना केवळ फॉर्म भरून घ्यायचा आहे, इतर सर्व प्रक्रिया ही अंगणवाडी सेविका करणार आहेत.

लेक लाडकी योजना फॉर्म PDF

Lek Ladki Yajana 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, यासाठी शासनाद्वारे Form PDF प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

या फॉर्म चा वापर करून लाभार्थ्यांना त्यांचा अर्ज अंगणवाडी सेविका कडे सादर करायचा आहे. खाली लेक लाडकी योजना फॉर्म pdf download साठी Direct Link दिली आहे. 

👉Lek Ladki Yajana Online Form Link 👈

लिंक वर क्लिक करा, फॉर्म PDF download करून त्याची प्रिंट आउट काढून घ्या. मग फॉर्म योग्य रीतीने भरून तो अंगणवाडी सेविका कडे सर्व आवश्यक कागदपत्रां सह जमा करा.

अंगणवाडी सेविका तुमची पुढील अर्ज प्रक्रिया पार पाडतील, आणि जेव्हा अर्ज Approve होईल तेव्हा तेव्हा लाभार्थी मुलीच्या नावे शासनाद्वारे पैसे जमा केले जातील.

लेक लाडकी योजनेचा फॉर्म तुम्ही जर अंगणवाडी सेविका कडे सादर केला, आणि त्यामध्ये कागदपत्रे अपूर्ण असतील तर पुढील 1 महिन्याच्या आत सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज सबमिट करायचा आहे.

अशा प्रकारे लेक लाडकी योजने साठी तुम्ही तुमचा अर्ज (फॉर्म) भरू शकता, अर्ज करताना कोणतीही अडचण येत असेल तर कृपया आम्हाला कळवा! आम्ही तुमची मदत नक्की करू, धन्यवाद..

8 thoughts on “लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? Lek Ladki Yojana Form PDF Download”

   • मला लेक लाडकी योजना फॉर्म भरायचा आहे. मला दोन मुली आहे. आणि मी ऑपरेशन सुद्धा केले आहे. मी बाहेरगावी कामासाठी राहते.मी याबद्दल गावी चौकशी केली तर ते बोलतात. की तुम्ही बाहेरगावी राहतात तर तुम्ही तिथेच फॉर्म भरा. आणि जेथे राहते तेथे म्हणतात तुम्ही गावी फॉर्म भरा. आता फॉर्म ची तारीख सुद्धा निघून गेली. आणि मला फॉर्म भरायचा आहे तर मग मी आता काय करावं. मला आतापर्यंत कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. अंगणवाडी सेविकांच्या चुकांमुळे अशावेळी आम्ही काय करायचं.

    Reply
    • त्या सेविके विषयी तकरार दाखल करा कामासाठी कुटही जा पन आपले आधार कार्ड ज्या गावाचे आहे तिथ फार्म भरला पाहीजे

     Reply

Leave a Comment