Join Whatsapp Group

Join Telegram Group

जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र, या तारखेला लागू होणार! जाणून घ्या | Juni Pension Yojana Maharashtra

Juni Pension Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचारी वर्गाद्वारे केली जात आहे. या संबंधी राज्य शासन लवकरच निर्णय घेणार आहे.

जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यात केव्हा लागू होणार? आणि ही जुनी पेन्शन योजना कोणी बंद केली होती? हे पण या लेखामध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे कृपया ही महत्वाची अशी माहिती संपूर्ण वाचा!

Table of Contents

जुनी पेन्शन योजना केव्हा लागू होणार? (Juni Pension Yojana Maharashtra)

जुनी पेन्शन योजना केव्हा लागू होणार?

जुनी पेन्शन योजना ही दिनांक 09 मार्च 2024 मध्ये अर्थसंकल्पात लागू केली जाणार आहे, त्या संबंधी अधिकृत घोषणा होणार आहे.

जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना ग्वाही देत, जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे असे म्हंटले आहे. 

लवकरच जुनी पेंशन योजना लागू होणार आहे, या संबंधी अधिकृत निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. 

जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय पुढील अर्थसंकल्पात करण्यात येणार, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. 

हे पण वाचा: लाडली बेहना योजना महाराष्ट्रात लागू होणार! जाणून घ्या संपूर्ण माहिती

त्यानुसार येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजेच 9 मार्च 2024 रोजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अधिकृत निर्णय राज्य शासन घेणार आहे.

या सोबतच 80 वर्षांवरील निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकार प्रमाणे निवृत्ती वेतन देण्याचा प्रस्ताव लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणजेच राज्य शासन पण केंद्राप्रमाणे कर्मचाऱ्यांना अधिकची पेन्शन देणार आहे.

सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादा देखील केंद्राप्रमाणे वाढवली जाणार आहे, म्हणजेच सिनियर (निवृत्ती वेतन धारक) कर्मचाऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे.

जुनी पेन्शन योजना कोणी बंद केली?

जुनी पेन्शन योजना कोणी बंद केली?

जुनी पेन्शन योजना ही काँग्रेस – राष्ट्रवादी युती सरकारने बंद केली आहे. (त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते)

जुनी पेन्शन योजना ही काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारने 31 ऑक्टोबर, 2005 रोजी बंद केली होती. योजना बंद करण्यासाठी सुलतानी नावाचा GR शासन निर्णय काढला होता, या शासन निर्णयाद्वारे शिक्षक /सरकारी कर्मचारी आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे हक्काचे पेंशन बंद करून टाकले.

पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि आवश्यक असा भाग असतो, आणि तोच हक्क या सुलतानी कायद्याच्या माध्यमातून हिरावून घेतला गेला.

हे पण वाचा: लेक लाडकी योजना, येथून लगेच अर्ज करा! संधी सोडू नका

मुख्य म्हणजे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, आणि अर्थमंत्री हे जयंत पाटील होते. त्यांच्या कार्यकाळात जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता. 

त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती सरकार होते, पण आताच्या घडीला ज्यांनी जुनी पेन्शन योजना बंद केली; तेच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. 

तुम्हाला (Juni Pension Yojana Maharashtra) बद्दल काय वाटतं? तुमचे अभिप्राय काय आहेत, येथे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा! आणि जुनी पेन्शन योजना खरचं लागू करायला पाहिजे का? हे पण सांगा.

Leave a Comment