Join Whatsapp Group

Join Telegram Group

Income Tax Saving: टॅक्स वाचवायचा आहे? लगेच हे 5 काम करा, 6 लाखांचा फायदा होइल!

मित्रांनो जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या पगारातून दरवर्षी टॅक्स कापला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का! तुम्ही Income Tax Saving करू शकता.

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Income Tax कसा वाचवायचा? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच टॅक्स वाचवण्यासाठी 5 पर्याय देखील सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त टॅक्स वाचवू शकाल.

शासनाच्या अनेक योजना आहेत, ज्या द्वारे तुम्ही तुमचा Income Tax वाचवू शकता. शासन देखील Income Tax Saving करण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहित करते, त्यामुळे तुम्ही जर सरकारने ठरवून दिलेल्या नियमात बसत असाल, तर तुम्हाला पण Income Tax वाचवता येऊ शकतो.

Income Tax Saving in Marathi

Income Tax हा नेहमी आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्नावर लागतो, त्यासाठी शासनाच्या काही ठराविक अटी असतात. जर त्या अटी मध्ये तुम्ही बसत असाल, तर तुम्हाला Income Tax वाचवता येतो.

योग्य प्रकारे जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला Tax वाचवता येऊ शकतो, अनेक अशा योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवू शकता.

आयकर कायदा 1962 अंतर्गत तुम्ही Life Insurance Premium वर देखील भरघोस Income Tax वाचवू शकता.

Income Tax Saving Options In Marathi

आता आपण जाणून घेऊया आयकर कायदा म्हणजे Income Tax Act 1962 नुसार टॅक्स वाचवता येणारे काही Income Tax Saving Options.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ (PPF)

दीर्घ कालावधी साठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक करून तुम्ही आयकर मध्ये सूट मिळवू शकता. ही योजना आयकर कलम 1962 अंतर्गत येते, यामुळे Income Tax वाचवण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF द्वारे तुम्ही 1.5 लाखापर्यंत आयकर वाचवू शकता, मोठी गोष्ट म्हणजे या योजनेत 7.1 टक्के एवढं व्याज मिळत. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 500 रुपयात खाते उघडता येते, आणि प्रत्येक वर्षाला 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. 

PPF योजनेत किमान 15 वर्षे गुंतवणूक करता येते, नंतर तुम्ही मुदत वाढवू पण शकता, प्रत्येक वर्षी 5-5 वर्षांनी मुदत वाढवता येते. मुदत संपल्यावर योजनेची मॅच्युरिटी होऊन, तुम्ही गुंतवलेली सर्व रक्कम पूर्ण व्याजासह मिळते.

ईपीएफ किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)

PPF योजने प्रमाणेच ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना आहे, यामधे कर्मचारी गुंतवणूक करून Income Tax वाचवू शकतात. 

आयकर वाचवण्यासाठी EPF हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये परतावा म्हणजेच गुंतवलेल्या रक्कमेवर व्याज मिळते, तसेच कर सवलतीचे देखील फायदे मिळतात.

पोस्ट ऑफिस सुकन्या समृध्दी योजना

पोस्टात तुम्ही सुकन्या समृध्दी योजना साठी अर्ज करून, तुमच्या मुलीच्या नावे गुंतवणूक करू शकता आणि कर सवलत पण मिळवू शकता.

सुकन्या समृध्दी योजना ही मुलींसाठीची खास योजना आहे, ज्यामध्ये मुलीचे पालक मुलीच्या नावे गुंतवणूक करू शकतात. यामधे एकूण 1.5 लाखांचा Income Tax वाचवला जाऊ शकतो.

या योजनेत फक्त 250 रुपया पासून पण गुंतवणूक करता येते, कोणत्याही Bank Saving Account पेक्षा या योजनेत जमा केलेल्या रक्कमेवर चांगले भरघोस 8.2 टक्के व्याज दिले जाते.

सुकन्या समृध्दी योजना ही आयकर कलम 80C अंतर्गत, नागरीकांना कर सवलत प्रदान करण्याचे काम करते.

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)

सेवानिवृत्ती पेन्शन योजना म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना द्वारे आयकर कलम 80C अंतर्गत तब्बल 1.5 लाख रुपये वाचवले जाऊ शकतात.

ही गुंतवणूक योजना इतर योजने पेक्षा खास आहे, कारण या योजनेत गुंतवणूक केल्यावर इतर योजने प्रमाणे 1.5 लाख रुपयां पर्यंत आयकर माफ होतेच, पण त्याहून अधिक म्हणजे आयकर कलम 80CCD (1B) द्वारे अतिरिक्त 50 हजार रुपये जास्तीचे वाचवले जाऊ शकतात.

जीवन विमा (Life Insurance)

तुम्ही तुमचा जीवन विमा उतरवून देखील आयकर वाचवू शकता, यासाठी तुम्ही LIC, SBI Life insurance, HDFC Life Insurance, Policy Bazaar Life Insurance यांसारख्या सरकारी किंवा खासगी कंपन्यांकडून जीवन विमा पॉलिसी घेऊ शकता.

केवळ जीवन विमा पॉलिसी नाही, तर कोणत्याही स्वरूपाची विमा पॉलिसी घेतली तरी तुम्हाला life insurance tax benefits मिळते. 

जर तुम्ही वेळेवर Life Insurance Premium भरले असेल, तर तुम्हाला एका आर्थिक वर्षा साठी 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकरात सूट मिळते.

तर मित्रांनो थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करून Income Tax Saving करू शकता. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात Income Tax वाचवायचा आहे, तर तुम्ही वरील सर्व योजनेत सहभागी होऊ शकता, आणि तब्बल 6 लाख रुपयांचा फायदा मिळवू शकता.

Leave a Comment