Join Whatsapp Group

Join Telegram Group

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, मिळणार ६०,००० रुपये! | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

आता Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे राज्यातील १२ वी पास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सरकार द्वारे तब्बल ६०,००० हजार रुपये एवढी आर्थिक मदत केली जाणार आहे. शाळकरी तसेच कॉलेज मधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हा लाभ मिळणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना द्वारे शिष्यवृत्ती स्कॉलरशिप स्वरूपात ही आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे. वर्षाला ३८,००० रुपये ते ६०,००० रुपये एवढी मदत मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले आधार योजना संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कोणते विद्यार्थी या Scholership Yojana साठी पात्र असणार? योजनेसाठी अर्ज कसा करायचा? किती रुपये आर्थिक मदत मिळणार? रक्कम कशा प्रकारे जमा होणार? 

अशी सर्व माहिती या लेखामध्ये सांगितली आहे, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा, आणि तुम्ही जर पात्र असाल, तर योजनेसाठी अर्ज करून फायदा घ्या.

Table of Contents

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

योजनेचे नावज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासनाद्वारे
विभागइतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग
बजेट १०० कोटी
केव्हा घोषणा झाली१३ डिसेंबर, २०२३
लाभार्थीOBC मागासवर्गीय समाजातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी
लाभार्थी विद्यार्थी संख्याप्रती जिल्हा ६०० प्रमाणे २१,६००  विद्यार्थी
योजनेचा लाभवर्षाला ४३ हजार ते ६० हजार रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन / ऑफलाईन

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana GR शासन निर्णय

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी राज्य सरकारने पहिला शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या शासन निर्णयाद्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच या शैक्षणिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे.

योजनेसाठी अजून एक शासन निर्णय प्रसिद्ध होणार आहे, ज्यावेळी हा शासन निर्णय प्रसिद्ध होईल तेव्हा अधिकृतरित्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू होईल.

ज्यावेळी या योजनेचा दुसरा शासन निर्णय जीआर प्रसिद्ध होईल तेव्हा त्याची लिंक आम्ही खाली देऊ, त्यामुळे ही पोस्ट बुकमार्क करून ठेवा, किंवा आमचा WhatsApp Group जॉईन करा, म्हणजे तुम्हाला अपडेट मिळेल.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana पात्रता निकष

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता निकष:

सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी राज्य सरकारने काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार जे विद्यार्थी पात्र असतील त्यांना योजनेद्वारे तब्बल ६० हजार रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

 • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
 • अर्जदार विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहत नसावा.
 • विद्यार्थ्याकडे ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गाचे कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्र असावे.
 • विद्यार्थी बाहेर गावी त्याचे उच्च शिक्षण घेत असावा.
 • केवळ OBC प्रवर्गातील उमेदवारांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात म्हणजे १२ वी मध्ये चांगले गुण मिळाले आहेत, त्यांना लाभ भेटणार आहे. 
 • सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ केवळ अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अटी आणि शर्ती

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी पात्रता निकष बरोबर काही अटी आणि शर्ती देखील सांगण्यात आल्या आहेत.

 • Dnyanjyoti Savitribai Phule Yojana साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा नुसार पात्र विद्यार्थी निवडले जाणार आहेत.
 • ज्या ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १२ वी मध्ये चांगले गुण मार्क मिळाले आहेत, त्यांची शॉर्ट लिस्ट केली जाणार आहे.
 • मेरिट लिस्ट नुसार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
 • प्रत्येक जिल्ह्यातून सर्वात जास्त गुण मिळवलेल्या ६०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
 • म्हणजे वर्षाला राज्यातील एकूण २१,६०० OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
 • शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य सरकारने ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी तब्बल १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
 • त्यानुसार २१,६०० विद्यार्थ्यांना ३८ हजार रुपये ते ६० हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Benifits लाभ आणि फायदे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप स्वरूपात आर्थिक मदत केली जाणार आहे.

राज्य शासनाद्वारे दिले जाणारी ही स्कॉलरशिप रक्कम ३८ हजार रुपये ते ६० हजार रुपये या दरम्यान असणार आहे. विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, त्यानुसार स्कॉलरशिप ची रक्कम ठरवली जाणार आहे.

जर विद्यार्थी मेट्रो सिटी मध्ये शिकत असेल, तर त्याला जास्त आर्थिक मदत मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी छोट्या शहरात आपले उच्च शिक्षण पूर्ण करत आहेत, त्यांना कमी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

सावित्रीबाई फुले आधार योजनेमध्ये एकूण तीन भत्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामधे भोजन भत्ता, निर्वाह भत्ता आणि निवास भत्ता असे तीन भत्ते दिले जाणार आहेत.

मोठे शहर असेल तर तेथे राहण्यासाठी जास्त खर्च लागतो, त्यामुळे जे विद्यार्थी मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात आपले उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांना जास्त मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अनुदान तपशील

मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

भोजन भत्ता३२,००० रूपये
निवास भत्ता२०,००० रूपये
निर्वाह भत्ता८,००० रूपये

प्रती विद्यार्थी संभाव्य वार्षिक खर्च ६०,००० रुपये

महानगर पालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

भोजन भत्ता२८,००० रूपये
निवास भत्ता१५,००० रूपये
निर्वाह भत्ता८,००० रूपये

प्रती विद्यार्थी संभाव्य वार्षिक खर्च ५१,००० रुपये

जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

भोजन भत्ता२५,००० रूपये
निवास भत्ता१२,००० रूपये
निर्वाह भत्ता६,००० रूपये

प्रती विद्यार्थी संभाव्य वार्षिक खर्च ४३,००० रुपये

तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

भोजन भत्ता२३,००० रूपये
निवास भत्ता१०,००० रूपये
निर्वाह भत्ता५,००० रूपये

प्रती विद्यार्थी संभाव्य वार्षिक खर्च ३८,००० रुपये

थोडक्यात वरील प्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अनुदान तपशील असणार आहे. 

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Documents आवश्यक कागदपत्रे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:

 • अर्जदार विद्यार्थ्याचे कास्ट सर्टिफिकेट
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • बँक खाते पासबुक प्रत
 • मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)

वर सांगितलेले सर्व कागदपत्रे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक आहेत. यामधे उमेदवाराने जे बँक खाते दिले आहे, त्याला आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Registration (Apply Online)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अद्याप सुरू झालेली नाही. एकूण २ शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. 

योजनेची अंमलबजावणी करण्याचा पहिला शासन निर्णय GR दिनांक १३ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध झाला आहे. दुसरा शासन निर्णय अजून आला नाही, त्यामुळे जेव्हा तो शासन निर्णय येईल तेव्हाच Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana साठी अर्ज सुरू होतील.

योजनेसाठी Registration हे Online किंवा Offline या दोन माध्यमातून होणार आहे. जेव्हा अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होईल, तेव्हा आम्ही Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Apply कसे करायचे? याची सविस्तर माहिती अपडेट करू, त्यामुळे आमचा WhatsApp Group नक्की जॉईन करा.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana FAQ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना केव्हा सुरू होणार?

Dnyanjyoti Savitribai Phule Yojana ही शासनाद्वारे अधिकृत शासन निर्णय जारी केल्या नंतर सुरू होणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

ज्ञानज्योती योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सुरू होणार आहेत, त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे किती रुपये मिळणार आहेत?

शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६०,००० रुपये पर्यंत आर्थिक मदत स्कॉलरशिप स्वरूपात दिली जाणार आहे.

Leave a Comment