Join Whatsapp Group

Join Telegram Group

चंद्रयान-3 : चंद्रावर उतरलेली ‘ही’ 6 चाकी गाडी तिथे काय-काय करणार? (Chandrayan 3)

Chandrayan 3: चंद्रयान 3 चे Landing यशस्वी झाले आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Soft Landing करणारा जगातील एकमेव अद्वितीय असा बहुमान भारताला मिळाला आहे. भारत देश हा पहिला असा देश बनला आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी रित्या Landing केली आहे. मोठी अभिमानाची बाब आहे, जगातील कोणताच देश जे शतकांपासून करू शकला नाही ते भारताने आता करून दाखवले आहे.

चंद्राच्या पृषठभागावर उतरल्यावर चांद्रयान (Chandrayan 3) नेमकं काय काय करणार, याविषयी इस्त्रोने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर माहिती प्रसारित केली आहे. त्या संबंधी आपण सविस्तर अशी माहिती आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत.

Table of Contents

Chandrayan 3 Landing

चंद्रयान 3 चा Pragyan Rovar हा चंद्रावर 1 Lunar दिवस राहणार आहे, आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची संपूर्ण माहिती मिळवणार आहे. चंद्राचा हा एक दिवस हा Lunar Day म्हणून ओळखला जातो, हा 1 लुनार दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा आहे. म्हणजेच चंद्रयान 3 हे चंद्रावर एकूण 14 दिवसांसाठी काम करणार आहे. आज 23 Augest, 2023 ला चंद्रयानाची यशस्वी Landing झाली आहे. म्हणजे आज पासून ते 5 सप्टेंबर किंवा 6 सप्टेंबर, 2023 पर्यंत चंद्रयान 3 चे काम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होणार आहे.

चंद्रयान 3 चे काम काय आहे?

8b5a5320 40a8 11ee 9b58 cb80889117a8

चंद्रयान 3 चे काम काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मित्रांनो आज पर्यंत मानव चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचू शकला नव्हता. पण आज भारताने इतिहास रचत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले पाऊल टाकले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवा चा सखोल अभ्यास करणे, दक्षिण ध्रुवावर पाणी आहे का? याचा शोध लावणे, जेणे करून ऑक्सीजन द्वारे चांद्रयानाला इंधन मिळू शकेल. आणि सोबतच दक्षिण ध्रुवावरील वातावरण कसे आहे, मानव वस्ती साठी ते अनुकूल आहे का? अशा महत्वाच्या बाबी वर चांद्रयान 3 काम करणार आहे.

चंद्रावर उतरताच…

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच विक्रम लँडरचा म्हणजेच चांद्रयान 3 (Chandrayan 3) चा एक Side Panel दुमडला जाईल, ज्यामुळे रोवरला चंद्रावर उतरण्यासाठी रस्ता मोकळा होईल.

4ccd9950 40a8 11ee 9b58 cb80889117a8 1

रोव्हर खराब होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे, याच दृष्टीने लँडरची निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून तो चंद्रावर Soft Landing करेल.

हा रोव्हर 6 चाकी Robotic वाहन आहे, जे 14 दिवस फिरून दक्षिण ध्रुवाची फोटो आणि माहिती गोळा करणार आहे.

या रोव्हरवर इस्रोचा Logo आणि तिरंगा लावण्यात आला आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर 4 तासांनी लँडरमधून बाहेर पडेल.

रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर 1 सेंटीमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरू शकणार आहे, हा त्याचा वेग असणार आहे. यादरम्यान कॅमेऱ्यांच्या मदतीने रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या गोष्टी स्कॅन करेल.

रोव्हर हा चंद्राच्या हवामानाची माहिती देखील घेणार आहे. रोव्हर मध्ये असे काही पेलोड्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाची चांगली माहिती मिळू शकेल. चंद्राच्या भूपृष्ठाखाली इयॉन्स आणि इलेक्ट्रॉनचं प्रमाण देखील शोधण्याचं काम तो करेल.

जसा जसा रोव्हर म्हणजे Pragyan Rovar चंद्राच्या जमिनीवरून पुढे सरकेल, तस तसे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर या रोव्हर च्या चाकावर लावलेले निशाण उमटणार आहेत. हे निशाण आहेत, भारताची राजमुद्रा म्हणजेच अशोक स्तंभ.

image search 1692804242997

रोव्हर ची Design अशा पद्धतीने बनविण्यात आली आहे, की तो चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करू शकेल. आणि नंतर ती सर्व माहिती लँडरला पाठवेल.

चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी लँडरकडे दोन आठवड्यांचा वेळ असणार आहे, म्हणजे ही मिशन 14 दिवस चालणार आहे.

रोव्हर हा केवळ Lander शी संपर्क साधू शकतो, तो थेट इस्रो च्या शास्त्रज्ञांना माहिती पाठवू शकत नाही. माहिती मिळवण्याची प्रक्रिया ही अशी आहे, सर्वप्रथम रोव्हर म्हणजे Pragyan Rovar चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची सविस्तर चाचपणी करेल, फोटो काढेल, अभ्यास करेल आणि मग तो सर्व Data Lander कडे पाठवेल. शेवटी Lander तो सर्व Data Recive करेल, आणि भारतील आपल्या इस्रो च्या शास्त्रज्ञांना पाठवून देईल.

Leave a Comment