Join Whatsapp Group

Join Telegram Group

चंद्रयान 3 मराठी माहिती Chandrayaan 3 Information in Marathi

Chandrayaan 3 Information in Marathi: नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे, चंद्रयान 3 इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रावर अखेर उतरला आहे. आपल्या सर्व भारतीयांना अभिमान वाटावे अशी ही आनंदाची बातमी आहे.

चंद्रयान 3 विषयी आपण आता माहिती जाणून घेऊ, नक्की चंद्रावर चंद्रयान 3 काय करणार? चंद्रयान 3 मोहिमेचा उद्देश काय आहे? अशी सर्व माहिती आता आपण पाहणार आहोत.

चंद्रयान 3 मोहीम काय आहे? (What is Chandrayaan 3 Mission)

चंद्रयान 3 मोहिम अखेर यशस्वी झाली आहे, या द्वारे आता भारत चंद्रावर जाणार जगातील चौथा देश बनला आहे. याहून अधिक गर्वाची गोष्ट म्हणजे भारताने जे चंद्रयान 3 चंद्रावर पाठवले होते, ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. खास गोष्ट म्हणजे चंद्राच्या या दक्षिण ध्रुवावर आज पर्यंत कोणताही देश पोहचू शकला नाहीये.

आता जे आपले चांद्रयान 3 होते, त्या सोबत रशियाचे पण Lunar यान होते. भारताच्या आगोदर रशियाने तो रोवर चंद्रावर उतरविण्याचा प्रयत्न केला, पण रशियाची ही मोहीम Fail झाली. त्यांचा Lunar रोवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यास असमर्थ ठरला. मात्र भारताने संयम राखून आपले चांद्रयान 3 हे काळजीपूर्वक चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Soft Landing केले, हे करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. आज पर्यंत या जगातील कोणत्याच देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले आहे.

चंद्राचा दक्षिण ध्रुव हा असा भाग आहे जो मानवाच्या अवाक्यापासून आज पर्यंत लांब होता. पण आता भारताने चंद्रावर पाऊल ठेवून अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. चंद्राचा हा दक्षिण ध्रुवाचा भाग सर्वात Special आहे, आणि एक गोष्ट म्हणजे हा भाग मानवी डोळ्याला कधीच दिसलेला नाही. चंद्राचा हा भाग कधीच पृथ्वी च्या समोर आलेला नसल्याने, या बद्दल मानवाला काहीच माहिती नाहीये.

चंद्र हा नेहमी एकच दिशेने Rotate करतो, पृथ्वी च्या गुरूत्वीय बलामुळे चंद्राचा दक्षिण ध्रुव नेहमी मागे राहतो. या मुळे या भागात कोणताही Lander उतरविणे सर्वात खडतर आहे.

आदित्य L1 मिशन मराठी माहिती

चंद्रयान 3 चंद्रावर काय शोधणार? काय करणार? चंद्रयान 3 चे काम काय आहे?

चंद्रयान 3 चे काम काय आहे? चंद्रयान 3 हे प्रग्यान रोवर (Pragyan Rover) च्या मदतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शोध घेणार आहे. चंद्रावर चंद्रयान 3 नेमके कोणत्या गोष्टीचा माहिती मिळवणार आहे ती खालील प्रमाणे आहे.

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किती प्रमाणात पाणी आहे?
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खनिजे कोणती आहेत? आणि किती आहेत?
  • भविष्यामध्ये चंद्रसदक्षिण ध्रुव मानवासाठी किती उपयोगी पडू शकतो?

या तीन प्रश्नांची उत्तरे चंद्रयान 3 मोहीमे द्वारे मिळवली जाणार आहेत.

सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भविष्यात मानव वस्ती राहण्यायोग्य वातावरण आहे का. दक्षिण ध्रुवाच्या जमिनीमध्ये पाणी आहे का? सोबतच चंद्रावर जीवन आहे का याचा देखील अभ्यास आपल्या भारताचे शास्त्रज्ञ करणार आहेत.

Chandrayan 3 Pragyan Rovar

चंद्रावर उतरलेली 6 चाकी गाडी, तिथे काय करणार? जाणून A to Z माहिती

चंद्रयान 3 मोहिम खास गोष्ट

एक मोठी खास गोष्ट अशी आहे की चंद्रयान 3 यान हे जेव्हा चंद्रावर उतरत होते सायंकाळी 6 च्या सुमारास तेव्हा अगदी Crucial Time होता Lander ची Speed कमी केली होती. आगोदर ठरवलेल्या ठिकाणी Lander उतरणार होते, पण त्या निश्चित जागी Lander ला उतरवने धोक्याचे होते. अगदी महत्वाचा असा हा Countdown होता. पण भारतीय शास्त्रज्ञानी अगदी येणं वेळी परिस्थिती जाणली, मागील मोहिमेतून शिकवण घेत अधिक काळजी घेतली गेली होती. त्यामुळे या चंद्रयान 3 Lander काही Advanced Technology वापरली गेली होती. आणि त्याच मुळे आज भारताचा चंद्रयान 3 चंद्राच्या अती दुर्गम भागात यशस्वी Soft Landing करू शकला.

जेव्हा चंद्रयान 3 Lander चंद्राच्या अगदी 25 किलोमीटर वर होता, तेव्हा त्याने Signal मिळवले मग जेव्हा चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाकडे खाली आले तेव्हा अगदी ऐनवेळी निश्चित स्थळी लँडिंग करणं शक्य नव्हतं ती जागा योग्य नव्हती. जर त्या जागी जर लँडिंग केली असती तर आता भारताचे चांद्रयान मोहीम यशस्वी झाली नसती. पण चंद्रयान 3 मध्ये Advenced Technology वापरली होती, तिच्या मुळेच चंद्रयान 3 Lander त्याच्या मनानुसार योग्य ठिकाणी वळू शकला.

ही Technology Ai शी साम्य आहे, म्हणजेच Ai Technology चा यात वापर केला गेला आहे. त्यामुळेच Lander ऐनवेळी अगदी काही मिनिटे Landing ला असताना Lander ने स्वतः हून त्याची Position Change केली, Lander थोडासा एका बाजुला वळला, आणि वेगळ्या ठिकाणी Land केले. या खास गोष्टी मुळेच आपले चंद्रयान 3 मोहिम यशस्वी होऊ शकली.

सध्या चंद्रयान 3 चंद्रावर कोठे आहे?

सध्या चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे, Soft Landing यशस्वी झाली आहे. सध्या Lander ज्या जागी land केले होते, त्याच जागी आहे कारण जेव्हा Landing झाली होती तेव्हा चंद्रावर मोठा धुळीचा गुबारा उठला होता, ही धूळ रासायनिक मिश्रणाने झालेली आहे. सगळी धूळ Lander च्या वर आहे त्यामुळे सध्या अजून काही वेळ Lander त्याच जागी राहणार आहे. आणि आज रात्री म्हणजे दिनांक 23 Augest, 2023 Time – 10: 00 PM ला ही धूळ चंद्राच्या जमिनीवर येणार आणि मग सर्व धूळ निघाल्यावर Lander मधून आपला प्रग्यान रोवर (Pragyan Rover) म्हणजे Robot निघणार आहे.

Pragyan Rovar Information

Pragyan Rovar हा एकूण पुढचे 14 दिवस चंद्रावर फिरणार आहे, सर्व परीक्षण करून Result पृथ्वीवर पाठवणार आहे. Pragyan Rovar मध्ये विशेष प्रकारचे कॅमेरा lense बसवले आहेत, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे फोटो काढून पाठवणार आहे.

सोबतच हा Pragyan Rovar पूर्ण सोन्याने Plated आहे, कारण दक्षिण ध्रुवावर सूर्याचे हानिकारक किरणे येतात त्यापासून Rovar चे रक्षण करण्यासाठी सोने आणि इतर धातू मिळून Pragyan Rovar बनवला गेला आहे.

चंद्रयान 3 केव्हा लाँच झाले? (Chandrayaan-3 Launch Date Time)

चांद्रयान 3 हे दिनांक 14 जुलै, 2023 रोजी लाँच करण्यात आले आहे. म्हणजेच शुक्रवारी ठीक 2:35 PM ला श्रीहरिकोटा येथून Chandrayaan-3 Launch केले आहे. मागील चंद्रयान मोहिमेत अगदी शेवटच्या क्षणी संपर्क तुटल्यामुळे चंद्रयान 2 मोहिम अपयशी ठरली होती. तेव्हा खुद्द आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. तेव्हा त्यांनी आपल्या शास्त्रज्ञांना दिलेला दिलासा हा खूप Emotional होता. पण आता अखेर या नव्या चंद्रयान मोहिमे द्वारे त्या अपयशाला यशात बदलण्याचा हा शास्त्रज्ञांचा मनसुबा आहे. आणि त्यासाठी मागील काही दिवसांपासून आपले ISRO चे शास्त्रज्ञ दिवस रात्र मेहनत घेत आहेत. आणि ती सर्व मेहनत अखेर आता यशस्वी झाली आहे, कारण आपले चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वी पने पोहोचले आहे.

चंद्रयान-3 या मोहिमेसाठी किती खर्च झाला? बजेट किती होते? (Chandrayaan-3 Mission Cost Budget)

चंद्रयान-3 मोहिमेसाठी एकूण खर्च हा 651 कोटी रुपये इतका आहे, आणि मोहिमेसाठी शासनाने 651 कोटी रुपये बजेट दिले आहे.

जगातील एकूण इतर 3 देशांनी आतापर्यंत चांद्रयान मोहिम सफलता पूर्वक पूर्ण केली आहे. त्यात अमेरिका, चीन, रशिया आणि आता 14 तारखे नंतर या लिस्ट मधे आपला भारत पण आला आहे.

Chandrayaan-3 FAQ

Q: चंद्रयान 3 केव्हा लाँच झाले आहे?

Ans: दिनांक 14 जुलै, 2023 रोजी ठीक दुपारी 2:35 PM च्या सुमारास चांद्रयान 3 लाँच झाले आहे.

Q: Chandrayaan-3 Cost in Rupees?

Ans: चंद्रयान 3 साठी एकूण खर्च हा 615 कोटी रुपये एवढा झाला आहे.

Q: Chandrayaan-3 Rovar Name?

Ans: Pragyan Rovar

निष्कर्ष Conclusion

तर मित्रांनो ही होती चंद्रयान मोहिम 3 बद्दलची माहिती, यात आपण Chandrayaan 3 Information in Marathi संबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेतली आहे. अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. धन्यवाद!

2 thoughts on “चंद्रयान 3 मराठी माहिती Chandrayaan 3 Information in Marathi”

Leave a Comment