Join Whatsapp Group

Join Telegram Group

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती | Affiliate Marketing In Marathi

Affiliate Marketing in Marathi: मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? आजकाल लोक Online पैसे कमवतात, थोडे फार नाही तर भरमसाठ! तुम्हाला पण नोकरी करून कंटाळा आला असेल, तर तुम्ही या नव्या मार्गांनी पण पैसे कमवू शकता.

Online जगात सर्वात जास्त पैसा कमवून देणारा मार्ग म्हणजे Affiliate Marketing या संदर्भातच आजच्या लेखामध्ये आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? त्यातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? नेमक काय काम करायचं असत? अशी संपूर्ण माहिती Affiliate Marketing in Marathi आपण पाहणार आहोत.

What is Affiliate Marketing in Marathi

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

मित्रांनो तुम्ही आज पर्यंत कधी ना कधी online सामान खरेदी केलच असेल, Affiliate Marketing याच्याशीच संबंधित आहे. म्हणजे पहा आपण ऑनलाईन Amazon किंवा Flipkart वरून एखादी वस्तू खरेदी करतो, पण त्या वस्तू जास्त विक्री व्हाव्या याच्या साठी Amazon आणि Flipkart द्वारे Program चालवले जातात. त्यालाच Affiliate Marketing Program असे म्हणतात.

यामध्ये Amazon किंवा Flipkart वरल्या वस्तूची जाहिरात आपल्याला करावी लागते, त्यासाठी आपल्याला फक्त त्यांच्या Product ची link लोकांपर्यंत पोहोचवायची असते. आणि जर लोकांनी वस्तू खरेदी केली तर त्याच काही commission आपल्याला कंपनी देते.

Affiliate marketing द्वारे कोणत्याही इतर मार्गा पेक्षा सर्वात जास्त पैसे कमवता येऊ शकतात. खूप सोप काम असत, पण अजून पर्यंत लोकांना या बद्दल माहिती नाहीये.

त्यामुळेच अजून आपल्या कडे लोक नोकरी साठी एवढी धडपड करतात, अफिलिएट मार्केटिंग चे काम जर तुम्ही एकदा शिकलात तर तुम्हाला घरी बसून पैसे कमवता येतात.

Affiliate marketing in Marathi for beginners

बघा मित्रांनो कोणतही काम करण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो, लगेच काहीही होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर हे अफिलिएट मार्केटिंगचे काम करायचे असेल तर सुरुवातीला सर्व आवश्यक अशा बाबी जाणून घ्या. Affiliate marketing शिका वेगवेगळे प्रयोग करा, खूप काही शिकण्यासाठी आहे.

सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर सुरुवातीला सोशल मिडीयावर आपले Account open करा, चांगले काम करून लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करा. एकदा तुमच्या कडे Audience आली कि तुम्ही त्यांना तुमच्या विषयाशी निगडीत काही Product Suggest करू शकता.

जर कोणाला ते Product आवडले तर ते Buy करू शकतात, आणि त्यातूनच तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता. केवळ Amazon affiliate program नाही तर अजून बरेचसे काही असते. तुम्ही Direct Product Affiliate पण करू शकता.

तुम्ही beginners असल्यामुळे सुरुवात Amazon affiliate marketing पासून करा, त्यात Success मिळाली कि मग तुम्ही हे इतर पण काम करू शकता ज्यामुळे पुढे जाऊन तुमची Income अजून वाढू शकते.

How to start affiliate marketing in Marathi

अफिलिएट मार्केटिंग कसे सुरू करावे? याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

अफिलिएट मार्केटिंग सुरु करण्यासाठी तुमच्या कडे कोणत्याही सोशल मिडीया Account वर Followers असावे लागतात. Followers असले म्हणजे तुम्ही कोणत्याही affiliate program साठी अर्ज करू शकता.

सुरुवातीला सर्वजण Amazon affiliate program द्वारेच Affiliate Marketing Start करतात, यावर तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमचे Account बनवू शकता, आणि पैसे कमावण्यासाठी पात्र होऊ शकता.

खाली काही स्टेप दिल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचा आणि तुमची affiliate marketing सुरु करा.

 • सोशल मिडीयावर Account उघडा, चांगले Followers मिळवा.
 • कोणत्याही affiliate program साठी अर्ज करा.
 • जे Product लोक सर्वात जास्त खरेदी करतात, ते निवडून त्याची affiliate link create करा.
 • त्या affiliate लिंक ला तुमच्या सोशल मिडीयावर शेअर करा.
 • जसे लोक त्या लिंकवर क्लिक करून ते Product खरेदी करतील, तसे तुम्हाला पैसे मिळतील.

तुम्ही Blogging द्वारे पण affiliate marketing सुरु करू शकता, त्यासाठी तुम्हाला Niche website बनवावी लागेल. यातून तुम्ही US ला टार्गेट करून जास्त कमिशन मिळवू शकता. त्यासाठी महत्वाचे म्हणजे जास्त लोकप्रिय आणि जास्त कमिशन देणार Product निवडता येणे. जर तुम्ही US, UK सारख्या देशात Affiliate Marketing केली तर तुम्ही खूप पैसे कमवू शकता.

Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

Affiliate Marketing In Marathi

Affiliate Marketing मधून पैसे कमावणे खूप सोपे आहे, वर सांगितल्या प्रमाणे तुम्हाला फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत Product ची लिंक पोहोचवायची आहे. जेवढे लोक Product खरेदी करतील तेवढीच तुम्हाला Commision मिळेल.

Affiliate marketing मधून जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही YouTube Channel सुरू करू शकता किंवा Instagram Page बनवू शकता या ऐवजी तुम्ही Facebook Group किंवा Page वरून पण Followers गोळा करून Affiliate marketing करू शकता.

अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये पैसे कसे मिळतात?

Affiliate marketing program मध्ये Product च्या खरेदी वर पैसे मिळत असतात, जास्त पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला जास्त कमिशन असलेल्या Product ची Affiliate marketing करावी लागेल.

जेवढी जास्त कमिशन तेवढी जास्त कमाई तुम्ही करू शकता, त्यामुळे Product निवडताना जास्त कमिशन ज्यावर आहे तेच निवडा म्हणजे तुम्ही जास्त पैसे कमवू शकता.

तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेत पण घेता येतात, त्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला तुमचे Bank Account तुमच्या Affiliate program सोबत जोडावे लागते.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे affiliate marketing मधून होणारी कमाई ही डॉलर्स मध्ये होते, त्यामुळे जो पर्यंत तुमच्या Account मध्ये 100$ होणार नाहीत तो पर्यंत तुमच्या बँकेत पैसे येणार नाही.

Payment मिळण्याचा Criteria तुम्ही कमी पण करू शकता, त्यासाठी Bank Details टाकताना तुमच्या सोई नुसार किती डॉलर झाल्यावर Payment येणार हे तुम्हाला ठरवायचे आहे, एकदा ही setting केली की नंतर पुन्हा एक महिन्या नंतरच ती बदलता येते, त्यामुळे काळजीपूर्वक सेटिंग्ज मध्ये बदल करायचा आहे.

एक Pro Tip फक्त तुमच्या साठी – तुम्ही अमेरिकेत पण Affiliate marketing करू शकता, तेथे तर मिळणारी कमिशन ही खूप असते, एका Product वर 5 ते 10 डॉलर एवढी कमिशन निघते. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे, तिथले लोक ऑनलाईन प्रॉडक्ट जास्त खरेदी पण करतात, त्या मानाने आपल्या कडे लोक तेवढं जास्त Online Product Buy करत नाहीत.

Affiliate Marketing साठी बेस्ट वेबसाइट्स कोणत्या आहेत?

काही लोकप्रिय Best Affiliate Marketing Websites पुढीलप्रमाणे:

 1. Amazon Affiliate
 2. Flipkart Affiliate
 3. Snapdeal Affiliate
 4. Clickbank
 5. Commission Junction
 6. eBay

सोबतच तुम्ही Direct Product Sell पण करू शकता, अथवा त्यांची Affiliate Marketing पण करू शकता. यामध्ये मिळणारे कमिशन हे जास्त असते.

Amazon affiliate marketing in Marathi

Affiliate Marketing Program मध्ये Amazon affiliate marketing ही सर्वात जास्त Famous आहे. कारण सर्व जण Amazon वर भरोसा करतात, त्यामुळे जर कोणी Amazon तर्फे Affiliate marketing करत असेल तर Sell होण्याची शक्यता जास्त असते.

Amazon affiliate marketing मध्ये Product वर कमिशन कमी असत, पण Amazon च्या Authority मुळे जास्त Sell होतात, त्यामुळे कमिशन कमी जरी असल, तरी कमाई चांगली होते.

जर तुम्ही Amazon affiliate program मध्ये सहभागी होऊ इच्छित असाल, तर तुम्ही येथे दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे, त्याच्या स्टेप या पुढीलप्रमाणे:

 • सुरुवातीला तुमच्या ईमेल द्वारे Sign in करा, अमेझॉन वर account नसेल, तर नवीन Create करा.
 • पुढे तुमच्या कडे जे सोशल मीडिया Account आहे, त्याची लिंक टाका.
 • विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, शेवटी Captcha टाकून अर्ज सबमिट करा.

अशा प्रकारे तुम्ही Amazon affiliate marketing program साठी अर्ज सादर करू शकता.

तर मित्रांनो मला आशा आहे, तुम्हाला Affiliate Marketing In Marathi बद्दल या पोस्ट मध्ये माहिती मिळाली असेल. यामुळे तुम्हाला जर मदत झाली असेल, एखादी नवीन Income stream मिळाली असेल, तर कृपया तुमच्या मित्रांना पण हि पोस्ट शेअर करा.

Leave a Comment