Join Whatsapp Group

Join Telegram Group

स्टॅम्प ड्युटी माफ होणार! अभय योजना 2024 मोठी संधी, लवकर पाहून घ्या | Abhay Yojana Maharashtra

Abhay Yojana Maharashtra: मित्रांनो महाराष्ट्र शासनाने थकबाकी दारांसाठी एक अभिनव अशी योजना आखली आहे, त्या नुसार सर्वांची थकबाकी 100% माफ होणार आहे.

त्यासाठी व्यक्तीला या योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे, जे लोक Abhay Yojana मध्ये सहभागी होतील त्यांच्या रक्कमेनुसार थकबाकी मध्ये सूट मिळणार आहे, याचा नागरिकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

अभय योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा? कोणकोणते फायदे मिळणार? थकबाकी कोणत्या निकषांवर माफ होणार? Abhay Yojana 2024 Last Date काय आहे, केव्हा पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील?

अशी सर्व माहिती सविस्तर मी या लेखामध्ये दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा! म्हणजे तुम्ही स्टॅम्प ड्युटी अभय योजनेचा लाभ घेऊ शकाल.

महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभय योजना

योजनेचे नाव अभय योजना 2024
उद्देशVAT, BST, CST थकबाकी दारांना थकबाकी मधून मुक्त करणे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील थकबाकीदार
लाभथकबाकी पासून व्यक्तींची सुटका.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळMahaGST

अभय योजना म्हणजे काय?

अभय योजना म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर बघा मित्रांनो ज्या व्यक्तींनी अद्याप VAT, BST, CST अशा करांची थकबाकी जमा केली नाहीये, त्यांना या थकबाकी मधून सुटका मिळवून देण्यासाठी ही अभिनव अशी Abhay Yojana महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.

या योजने अंतर्गत थकबाकी दारांना मोठा फायदा होणार आहे, थकबाकी मधून मुक्त होण्याची ही एक सुवर्णसंधी शासनाने नागरिकांना दिली आहे.

व्यापारी, उद्योजक यांच्या साठी या योजनेचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. तसेच करात (Tax) आणि करावरील व्याजाच्या (Tax Interest) रक्कमेत पण भरघोस सूट मिळणार आहे.

Abhay Yojana 2024 Benifits

अभय योजना द्वारे मिळणारे फायदे हे भरपूर आहेत, मुख्य बाब म्हणजे थकबाकीदार थकबाकी पासून कायमचा मुक्त होऊ शकतो.

अभय योजनेद्वारे मिळणारे फायदे लाभ:

 • अभय योजनेद्वारे २ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या थकबाकी कर पूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत 
 • २ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या व्यक्तींना ५० ते ७० टक्के एवढी सूट मिळणार आहे.
 • सोबतच थकबाकी वरील Tax मध्ये ८५ ते ९० टक्के एवढी सवलत मिळणार आहे.
 • एखाद्या व्यापाऱ्याची थकबाकी ५० लाखांपेक्षा कमी असेल तर त्याला थकबाकी वर २०% सूट मिळणार आहे. म्हणजे २० टक्के रक्कम परत मिळणार आहे.
 • ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असेल, तर त्यासाठी देखील अभय योजनेत तरतूद करण्यात आली आहे.

Abhay Yojana 2024 Last Date (शेवटची तारीख)

अभय योजनेत दोन टप्प्यावर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत, यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ जानेवारी २०२४ होती, पण आता योजनेसाठी मुदतवाढ मिळाली आहे.

अभय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख (Abhay Yojana 2024 Last Date) ही ३१ मार्च २०२४ आहे. 

मार्च महिना संपल्यावर अभय योजनेसाठी अर्ज करता येणार नाही, फॉर्म स्वीकारणे बंद होईल! त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर कृपया योजनेची Last Date संपण्यापूर्वी फॉर्म भरून घ्या.

Abhay Yojana Application Form ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

Abhay Yojana Maharashtra

अभय योजना साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

 1. MahaGST या (Abhay Yojana) Official Website ला सर्वप्रथम भेट द्या.
 2. तुम्हाला वेबसाईट वर थकबाकी माफी अर्ज दिसेल, तो तुम्हाला Download करून घ्यायचा आहे. 
 3. संकेतस्थळावर नोंदणी करून घ्यायची आहे, नंतर Login करायचा आहे. Download केलेल्या अर्जाची प्रिंट काढून तो काळजीपुर्वक भरायचा आहे.
 4. MahaGST Official Website वरून अभय योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना हा अर्ज तुम्हाला योग्य Formate मध्ये अपलोड करायचा आहे.
 5. फॉर्म हा .txt file मध्ये असावा, नंतर अर्ज अपलोड झाल्यावर आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील Soft Copy स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
 6. फॉर्म भरून झाल्यावर शेवटी सबमिट करायचे आहे, थकबाकीची पोचपावती Download करून घ्यायची आहे.
 7. नंतर Official Website वरूनच Payment चा फॉर्म भरून घ्या, वर दिलेल्या अटी नुसार जेवढी तुमची थकबाकी आहे, त्यानुसार उर्वरित रक्कम Payment करा.
 8. Payment केलेली Receipt Download करून घ्या, Transaction पावती जवळ ठेवा.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या थकबाकी पासून कायमची मुक्तता मिळवू शकता. अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे, फॉर्म भरताना काही अडचणी आल्या, तर येथे कमेंट करा! मी तुमच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर देईल.

Leave a Comment